• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्यावर एअरपोर्टवर हल्ला, मागून धावत येत हल्लेखोराने मारली उडी आणि...

VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्यावर एअरपोर्टवर हल्ला, मागून धावत येत हल्लेखोराने मारली उडी आणि...

बंगळुरू विमानतळावर अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi attacked on airport) सहाय्यकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये हा हल्ला विजयवरच झाल्याचे म्हटले जात आहे

 • Share this:
  बंगळुरू, 04 नोव्हेंबर: लोकप्रिय कलाकार मंडळी सार्वजनिक ठिकाणी नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या गराड्यात असतात. दरम्यान अनेकदा अशावेळी त्यांना कठीण प्रसंगांना देखील सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती (Vijay Sethupathi Latest Update) याच्यासह घडला आहे. बंगळुरू विमानतळावर अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi attacked on airport) सहाय्यकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये हा हल्ला विजयवरच झाल्याचे म्हटले जात आहे. सहकारी, सुरक्षा रक्षक त्याचप्रमाणे पर्सनल असिस्टंट यांच्यासह बेंगळुरू विमानतळावर (Vijay Sethupathi attacked by stranger on Bangalore Airport) चालत असताना हा प्रकार घडला. अचानक एका माणसाने विजयच्या सहकाऱ्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अभिनेता विजय देखील अडखळतो. या घटनेनंतर सेतुपतीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताबडतोब घेरले आणि कोणतंही नुकसान करण्यापासून रोखलं आहे. हे वाचा-Aryan Khan Case: मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाच CCTV फूटेज, मोठा खुलासा होणार? व्हिडीओत आपण पाहू शकतो की विजयसह चालणाऱ्या व्यक्तीने संबंधित व्यक्तीने हल्ला केल्यानंतर प्रतिहल्ला केला आहे, पण सुरक्षा रक्षकांनी रोखल्यामुळे हा प्रसंग एवढ्यावरच निभावला. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी दावा केला होता की अभिनेत्यावरच हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार विजय एका चित्रीकरणासाठी बंगळुरू याठिकाणी गेला होता. आयएएनएसशी बोलताना अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, बुधवारी पहाटे बेंगळुरू विमानतळावर ही घटना घडली. ‘मास्टरशेफ तमिळ’च्या आगामी प्रीमियरच्या शूटिंगसाठी विजय सेतुपती बेंगळुरूला पोहोचल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक अकाउंट्सवरुन शेअर करण्यात आला आहे. बेंगळुरू एअरपोर्ट पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना तेव्हा घडली जेव्हा सेतूपतीचा पर्सनल असिस्टंट त्याच्यासाठी एअरपोर्टवरील रस्ता मोकळा करत होता. त्यावेळी अभिनेत्याच्या या पीएची हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी शाब्दिक चकमक झाली. याठिकाणी वादावादी झाली पण कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न झाल्याची माहिती समोर आली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: