प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला अटक, महाराष्ट्रात शुटिंगदरम्यान 30 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • Share this:
  प्रवीण तांडेकर, गोंदिया, 3 नोव्हेंबर : विनोदी अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी काल रात्री त्यांना अटकही केली आहे. विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे येथे विजय राज यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ गोंदियातील हॉटेल गेटवे येथे मागील पंधरा दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. विजय राज
  विजय राज
  शुटींगदरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टाफमधील युवतीची छेड काढली, असा आरोप आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. हेही वाचा - धावत्या कारमध्ये तरुणाने कापून घेतली हाताची नस, खेडमधील थरारक घटना दरम्यान, चित्रपटांत आपल्या अचूक टायमिंगमुळे विनोदी अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या विजय राज यांच्यावर अशा प्रकारे आरोप झाल्यामुळे आणि त्यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
  Published by:Akshay Shitole
  First published: