मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD : बॉलिवूड स्टार वरुण धवनला व्हायचं होत कुस्तीपटू; मात्र असिस्टंट डायरेक्टरवरुन बनला अभिनेता

HBD : बॉलिवूड स्टार वरुण धवनला व्हायचं होत कुस्तीपटू; मात्र असिस्टंट डायरेक्टरवरुन बनला अभिनेता

इंग्लंडच्या नॉटिंघम ट्रेंट विद्यापिठातून (Nottingham Trent University) वरुणने पदवी शिक्षण पुर्ण केलं होतं. तसंच त्याने 2010 साली आलेल्या करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टरचं काम केलं होतं.

  • Published by:  News Digital

मुंबई 24 एप्रिल : बॉलिवूडचा चार्मिंग, हॅन्डसम हंक अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) आज वाढदिवस आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच वरुणने अनेक हीट चित्रपट दिले. आपल्या अभिनयासोबतच तो त्याच्या नृत्यासाठीही प्रसिद्ध आहे. चित्रपटांत येण्यापूर्वी वरुणने पडद्यामागेही काम केलं आहे. वरुणचा आज 34 वा वाढदिवस आहे. वरुणला फिल्मी पार्श्वभूमी असली तरीही असिस्टंट डायरेक्टर (assistant director) पासून त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. वरुणचे वडील डेविड धवन (Devid Dhawan) आणि भाऊ रोहित धवन दोघेही दिग्दर्शक आहेत.

वरुणने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्याला सुरुवातीला कुस्तीमध्ये फार रस होता. त्याला कुस्तीपटूच (wrestler) व्हायचं होत. पण त्यानंतर त्याची चित्रपटांत रुची वाढत गेली आणि त्याने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. वरुणने इंग्लंडच्या नॉटिंघम ट्रेंट विद्यापिठातून (Nottingham Trent University) पदवी शिक्षण पुर्ण केलं होतं. त्याने बिजनेस मॅनेजमेंट विषयात पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने चित्रपटांत लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याने 2010 साली आलेल्या करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टरचं काम केलं होतं. चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलच्या प्रमुख भूमिका होत्या.

वरुणने या वर्षाच्या सुरुवातीला प्रेयसी नताशा दलाल (Natasha Dalal) हिच्याशी विवाह केला. नताशा आणि वरुण हे अगदी शाळेपासूनच ओळखीचे होते. एका कार्यक्रमात त्याने त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. वरुण आणि नताशा हे इयत्ता सहावीत असताना एकमेकांना भेटले होते. त्यानंतर 12 वी पर्यतं ते चांगले मित्र होते. वरुणने अनेक वेळा नताशाला प्रपोझ करण्याचा प्रयत्न केला, पण नताशा त्याला नकार देत होती. अखेर काही दिवसांनंतर नताशाने त्याला होकार दिला. नताशा एक फॅशन डिझायनर आहे.

(वाचा - 'थोडी तरी लाज बाळगा' मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांवर भडकला नवाझुद्दिन)

2012 साली ‘स्टुडंट ऑप द इयर’ (Student of the year)  या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आलिया भट सोबत त्याची जोडी फारच हिट ठरली होती. त्यानंतर त्याने 'मैं तेरा हीरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'दिलवाले', 'बदलापुर', 'एबीसीडी 2', 'ढिशूम', 'जुड़वा 2', 'ऑक्टोबर', 'स्ट्रीट डांसर 3 डी', 'कलंक' आणि 'कुली नं 1' असे हिट चित्रपट त्याने दिले.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Varun Dhawan