अन् वरुण धवननं त्या लहान मुलीला गंडवलं; Video पाहून हसून हसून व्हाल वेडे

अन् वरुण धवननं त्या लहान मुलीला गंडवलं; Video पाहून हसून हसून व्हाल वेडे

वरुण धवननं लहान मुलीचा केला मूडऑफ; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल : अनेक व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात पण अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) चा एक व्हिडीओ असा आहे ज्यात त्याने चक्क लहान बाळाचा मूडऑफ केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर अगदी कमी वेळात या व्हिडीओ ला भरपूर लाइक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत.

अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भेडीया’चं (Bhedia)  शुटींग करत आहे. अरुणाचल प्रदेशात हे चित्रिकरण सुरू आहे. वरुण ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:च एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो चित्रपटाच्या सेटवर एका लहान मुलीचा वाढदिवस साजरा करत आहे. पण केक कापल्यानंतर तो केक भरवण्यासाठी हात उचलतो पण तो केक त्या लहान मुलीला न भरवता त्याने तिच्या वडीलांना भरवला, पण केक खाण्याची वाट पाहत असलेल्या त्या लहान बाळाचा चांगलाच मूडऑफ होतो. व्हिडीओमध्ये त्या लहान मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. व कशाप्रकारे त्याला टाळण्यात आल्याने तो नाराज झाला हे स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी कमी काळात व्हायरल होत आहे. वरुणच्या फॉलोवर्स सोबतच अनेक सेलिब्रिटींनीही यावर कमेंट केली आहे. सर्वात आधी वरुणची कोस्टार अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. आणि त्यानंतर वरूनला त्याची चूक लक्षात येते व तो ही व्हिडीओ पोस्ट करतो. वरुण कडून नकळत घडलेल्या या प्रसंगाने त्याचे चाहते मात्र मनसोक्त  एन्जॉय करत आहेत. अनुष्का शर्मा (Anushka Sharma), क्रिती सेनन, मसाबा गुप्ता, फरहान अख्तर या सेलिब्रिटींनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

‘सामान्य माणूस घरात मग क्रिकेटपटू बाहेर कसे?’; राखी सावंत IPL वर संतापली

भेडीया हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिल 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात वरुण धवन व्यतिरीक्त अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे.

Published by: News Digital
First published: April 18, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या