विनाकारण ट्रोल करणाऱ्या युजरला वरुण धवनने दिलं सडेतोड उत्तर

विनाकारण ट्रोल करणाऱ्या युजरला वरुण धवनने दिलं सडेतोड उत्तर

"माझे काही जवळचे लोक कोरोनाने दगावले आहेत....." विनाकारण ट्रोल करणाऱ्या युजरला वरुणने सणसणीत उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा (trolling on social media) फारच ट्रेंड सुरू आहे. या ट्रोलिंगला सेलिब्रिटीजनेही उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. अनेकदा हे ट्रोलिंग कोणत्याही पडताळणी शिवाय केलं जातं. आणि खोट्या अफवा पसरल्या जातात. असंच काहीसं अभिनेता वरुण धवनच्या (Varun Dhawan) बाबतीत घडलं आहे. उगाचच ट्रोल केल्यानंतर त्याने त्या युजरला (Varun replied to user) सणसणीत उत्तर दिलं आहे.

सध्या अनेक सेलिब्रिटी हे मालदीव आणि विविध देशांत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टिका केली जात आहे. यातच अभिनेता वरुण धवन हा त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) सह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. आणि त्यानंतर त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पण अभिनेता वरुण धवन यांचा संताप अनावर झाल्याने त्याने एका युजरला उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

त्या युजरने लिहिलं होत, “तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जाता आणि मीडियाला फोटो काढण्याची संधी देता. मग तुम्ही परत येता आणि तक्रार करता. तुमची श्रीमंती दाखवणं सोडा, तुमच्या देशातील लोक मरत आहेत”.

यावर वरूणने उत्तर देत म्हटल, “तर तुमचा अंदाज चुकला आहे, मी व्हेकेशनवरून नाही तर शुटींग वरून परतत आहे. आणि संधी देता म्हणजे नेमक काय..? माझे काही जवळचे लोक कोरोनाने दगावले आहेत त्यामुळे तुमचे निरर्थक अंदाज तुमच्याकडेच ठेवा”, अशा शब्दात वरुणने उत्तर दिलं आहे.

(वाचा - मुलासोबत आक्षेपार्ह फोटो घेणं अभिनेत्रीला पडलं महागात, खावी लागली जेलची हवा)

दरम्यान वरुण धवन हा त्याचा आगामी चित्रपट भेडीया (Bhedia) साठी अरुणाचल प्रदेशमध्ये काही दिवस शुटींग करत होता. अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील याच चित्रपटासाठी शुटींग करत होती. दोघेही नुकतेच मुंबईत परतले आहेत.

Published by: News Digital
First published: April 22, 2021, 12:20 PM IST

ताज्या बातम्या