300 राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबत उपेंद्र लिमये झालाय सज्ज

300 राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबत उपेंद्र लिमये झालाय सज्ज

अभिनेता उपेंद्र लिमये एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : सशक्त अभिनय,  आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांमधून रसिकांचं मनोरंजन करतो. प्रत्येक भूमिकेतले वेगवेगळे पैलू उपेंद्र उत्तम मांडतो.  आजवरच्या त्याच्या विविध भूमिकांमध्ये आणखी एका चॅलेंजिंग पात्राची भर पडली आहे. 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला तो एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुठल्याही क्षेत्रात दिशादर्शकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असतं. शिक्षक-प्रशिक्षकांची दूरदृष्टी आणि स्वानुभव मुलांना केवळ योग्य ती दिशाच नाही तर त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देण्याचं काम करतं. अशाच एका कुशल सारथीची भूमिका 'सूर सपाटा'च्या निमित्ताने उपेंद्र लिमये साकारत आहे. गावखेड्यातील आपल्या मातीतला खेळ म्हणजेच कबड्डीच्या अनुषंगाने या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. त्याचं दिग्दर्शन मंगेश कंठाळे यांनी केलं आहे. अभिनय जगताप यांनी संगीत दिलंय.

शाळेतल्या टवाळ मुलांमधील कौशल्य जाणून त्यांना कबड्डी खेळासाठी प्रवृत्त करताना, कधी काट्यावर धरणारे कडक प्रशिक्षक तर कधी मुलांच्या बाजूने उभे राहणाऱ्या प्रेमळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये आपल्याला दिसणार आहे. याआधी यलो सिनेमात उपेंद्रनं स्वीमिंग प्रशिक्षकाची भूमिका केली होती.

25 दिग्गज कलाकारांचा ताफा या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून त्यांची नावं सध्या गुलदस्त्यात आहेत. 'सूर सपाटा' या  चित्रपटाच्यानिमित्ताने ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूही सिनेमात आहेत. हा रोमांचकारी खेळ सिनेमात प्रेक्षकांची उत्सुकता किती ताणून ठेवणारा आहे हे 22 मार्चला कळेल.


#FitnessFunda : गॅरीचं सगळं लक्ष असतं हेल्दी डाएटवर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या