मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

EXCLUSIVE: अनेक मालिका नाकारून 8 वर्षांनी का निवडली उमेशने ‘ बरसात’?

EXCLUSIVE: अनेक मालिका नाकारून 8 वर्षांनी का निवडली उमेशने ‘ बरसात’?

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची नवी मालिका 'अजूनही बरसात आहे' नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेतल्या लव्हस्टोरीच्या प्रेमात कसा पडलो, हे उमेशच्याच शब्दांत...

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची नवी मालिका 'अजूनही बरसात आहे' नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेतल्या लव्हस्टोरीच्या प्रेमात कसा पडलो, हे उमेशच्याच शब्दांत...

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची नवी मालिका 'अजूनही बरसात आहे' नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेतल्या लव्हस्टोरीच्या प्रेमात कसा पडलो, हे उमेशच्याच शब्दांत...

सोनाली देशपांडे

मालिकांच्या गर्दीत सध्या एका मालिकेने लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे सोनी मराठीवरची ‘ अजूनी बरसात आहे ’. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकत आहेत. त्यानिमित्तानं आम्ही उमेशला गाठलंच.

वादळवाट असेल, असंभव असेल किंवा एका लग्नाची तिसरी गोष्ट असेल, उमेश मालिका निवडीबद्दल चोखंदळच आहे. पण पुन्हा मालिका करण्यासाठी त्याने तब्बल 8 वर्षं घालवली. यावर उमेश म्हणतो, ‘ मधल्या काळात मला विचारणा झाली होती. पण बऱ्याचदा मला कथा आवडायची नाही. पुन्हा मी माझ्या नाटकामध्येही खूप बिझी होतो. दैनंदिन मालिका म्हणजे एक कमिटमेंट असते. तुमच्या बरोबर कोण काम करणार हे पण महत्त्वाचं असतं. तेव्हा माझ्याबरोबर मुक्ता आहे, असं कळलं. आयरीशसारखं मोठं प्राॅडक्शन आहे, सोनी मराठीनं मला गोष्ट सांगितली, इतर कलाकार कोण आहेत, ते कळलं. टीम आवडली, गोष्ट टिपिकल होणार नाही, ते जाणवलं.’

उमेश या मालिकेतल्या लव्हस्टोरीच्या प्रेमात पडला. ‘ ही पस्तीशीतली प्रेमकथा आहे. यात दोघं दहा वर्षांपूर्वी भेटून वेगळे झालेत आणि आता पुन्हा भेटलेत. मला हा प्लाॅटच खूप आवडला,’ उमेश सांगतो.

ही मालिका स्वीकारण्यामागचं उमेशचं आणखी एक कारण म्हणजे मुक्ता बर्वे. ‘ मुक्ताचं नाव कळल्यावरच मला आनंद झाला. मुक्ता एक फोकस्ड आणि गुणी अभिनेत्री आहे. दैनंदिन मालिकेचे काम दिवसभर चालतं. घरापेक्षा तुम्ही जास्त वेळ सेटवर असता. मग अशा कलाकारांबरोबर काम केल्याने दिवसाच्या शेवटी तुम्हाला एक समाधान मिळतं. कारण कलाकार म्हणून तुम्ही नवी नवी आव्हानं स्वीकारत असता. शिवाय ताकदीचा कलाकार तुमच्या बरोबर असणं, हे खूप चांगलं आहे.  मुक्तासोबत काम करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मुक्ता माणूस म्हणूनही धमाल आहे.’

प्राजक्ता माळी सांगणार आपलं गुपित; लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास

मधल्या काळात उमेश कामत आणि प्रियाला कोरोना झाला होता. त्यातून ते पूर्णपणे बरे झालेही. त्या काळाबद्दल सांगताना उमेश म्हणाला, ‘ आम्ही सगळी काळजी घेतली होती. पण दुर्दैवाने काय कसं झालं ते कळलं नाही. आम्ही ‘आणि काय हवं’ च्या तिसऱ्या सिझनचं शूटिंग करत होतो. तिथे संसर्ग झाला. मी आणि प्रिया एकत्रच क्वारंटाइन झालो. त्यामुळे एकटं नाही वाटलं. त्यावेळी आमच्या मित्रांनी आम्हाला उत्तम सपोर्ट केला. डाॅ. केळकरांनी आमच्यावर चांगल्या प्रकारचे उपचार केले. त्यांनी आम्हाला घाबरू दिलं नाही. प्रियाची बहीण त्यावेळी घरी होती. तिनं आमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. त्यामुळे आम्ही रिकव्हर झालो. मोठ्या संकटातून बाहेर आलो.’

सध्या नाटक बंद आहे. यावर उमेश म्हणतो, ‘ माझं प्रामाणिक मत आहे की हे जे पॅन्डॅमिक आलंय, ते थोड्या काळासाठी आलेलं नाही. जास्त काळ यात जाणार आहे. अशा वेळी लोकांसाठी करमणूकही गरजेची आहे. कारण मानसिक संतुलन चांगलं राहणंही गरजेचं आहे. योग्य काळजी घेऊन, नियम पाळून आपण नाट्यगृह सुरू करू शकतो. सरकार योग्य वेळी निर्णय घेईल. आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. प्रेक्षकांनीही जबाबदारीने वागलं पाहिजे. आम्ही निर्माते, कलाकार म्हणून काळजी घेऊच.’

'देवमाणूस' मंगल, वंदीआत्यासह लेडी गॅंगचा धमाकेदार डान्स; VIDEO होतोय VIRAL

इतर वाहिन्यावरचे प्रेक्षक सध्या उमेश-मुक्ताच्या नावावरून सोनी मराठीकडे वळले आहेत. काय वाटतं उमेशला ? ‘ अरे वा, हे चांगलंच आहे.’ उमेश खूश होऊन सांगतो. ‘हे टीम एफर्ट आहे. आमची गोष्ट चॅनेलच्या क्रिएटिव्ह टीमकडून डेव्हलप होत असते. लेखक, दिग्दर्शक असतात. आम्ही कलाकार म्हणून त्याच छोटासा भाग असतो. लोकांपर्यंत पोचवण्यासाठी चॅनेल मेहनत घेत असते. मला वाटतं, लोकांच्या करमणुकीसाठी अशी हेल्थी स्पर्धा असायला हरकत नाही. त्यामुळे चांगले कार्यक्रम तयार होतील. आताच्या काळात लोकांना याची खूप गरज आहे.’

उमेश कामतने असेच चांगले शोज, मालिका द्यावात, हीच तर प्रेक्षकांची अपेक्षा आहे. नव्या मालिकेसाठी त्याला शुभेच्छा.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

First published:

Tags: Marathi entertainment, TV serials