Home /News /entertainment /

'चौकातला गजर, पाऊस, पाय रंगवून टाकणारी रांगोळी'; तेजस बर्वेची लक्ष्मी रोडविषयी मार्मिक पोस्ट

'चौकातला गजर, पाऊस, पाय रंगवून टाकणारी रांगोळी'; तेजस बर्वेची लक्ष्मी रोडविषयी मार्मिक पोस्ट

Tejas Barve

Tejas Barve

यंदा गणेशोत्सवाला कोणतेही निर्बंध नसणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. अभिनेता तेजस बर्वेनंही बाप्पांच्या आगमनाची एक खास पोस्ट शेअर केली आहे (Tejas Barve).

  मुंबई, 6 ऑगस्ट: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सवाला कोणतेही निर्बंध नसणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. बाप्पांच्या आगमनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून अनेकजण 'बाप्पा ह्या वर्षी वाजत गाजत या' अशा पोस्ट शेअर करत आहे. अशातच अभिनेता तेजस बर्वेनंही बाप्पांच्या आगमनाची एक खास पोस्ट शेअर केली आहे (Tejas Barve). अभिनेता तेजस बर्वेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ढोल-ताशे वाजवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तेजसनं एक भलंमोठं कॅप्शनंही लिहिलं आहे. 'प्रिय लक्ष्मी रोड, गेली 2 वर्ष तू आम्हाला आणि तितकंच आम्ही तुला मिस केलंय रे...चल.. ह्या वर्षीपासून तेच आपलं पूर्वीचं नातं पुन्हा जगू...बाप्पा पुन्हा येतोय आपल्यासोबत तोच समाधान चौकातला गजर, पावसात ओली झालेली आणि पाय रंगवून टाकणारी रांगोळी, शगुन चौकातला खेळ, अलका चौकातला शेवटचा गजर पहायला ...पुन्हा 'तोच' लक्ष्मी रोड पहायला, बाप्पा ह्या वर्षी वाजत गाजत या..'.
  View this post on Instagram

  A post shared by Tejas Barve (@tejas.barve_)

  तेजसनं शेअर केलेली ही पोस्ट सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट केलेल्या पहायला मिळत आहे. तेजसप्रमाणे सगळ्यांनीच कोरोनाची दोन वर्षे धुमधडाक्यातला गणेशोत्सव मीस केला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी सगळेजण मोठ्या प्रमाणावर उस्तुक आहेत. हेही वाचा -  Vaibhav Tatwawadi: अभिनेता स्क्रिप्ट वाचण्यात झालाय दंग, फोटो शेअर म्हणतोय... दरम्यान, तेजस सध्या सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ मालिकेत एंट्री घेताना दिसून आला आहे. बॉस आणि मिहीर यांच्या नात्याला एक वेगळं वळण द्यायला आलोक हे पात्र तो साकारताना दिसणार आहे. आलोकच्या एन्ट्रीने मालिकेत नेमकं काय वळण येतं हे पहायची उत्सुकता सध्या बरीच असल्याच दिसून येत आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Ganesh chaturthi, Instagram post, Marathi entertainment, Social media

  पुढील बातम्या