मुंबई, 23 मे : अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या अभिनयाइतकाच फॅमिली मॅन म्हणूनही ओळखला जातो. कामाव्यातिरिक्त जास्तीत जास्त वेळ तो कुटुंबासोबत घालवतो. आता त्याच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच मायराचा (Myra) वाढदिवस असल्याने त्याने एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.
मायराचा वाढदिवस असल्याने स्वप्निल आणि त्याच्या आईने तिला गोड भेटवस्तू दिली आहे. ही भेटवस्तू नावाइतकीच गोड आहे. ती म्हणजे अस्सल साजूक तुपातली आणि तेही आजीच्या हातची गरमागरम ‘पुरणपोळी’. ही चविष्ट पुरणपोळी खाऊन मायराही खूप खूश झालेली दिसते आणि शेवटी ती आजीला धन्यवाद करते. स्वप्निलने त्याच्या सेशल मिडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता.
View this post on Instagram
स्वप्निलने या वाढदिवसाच्या निमित्ताने आजी आणि नातीच्या सुंदर नात्याचं दर्शन घडवलं आहे. तर कोणताही भरीव व महागडा वाढदिवस न करता असा लाखमोलाचं नातं जपणारा वाढदिवस साजरा केल्याने त्याला अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.
बनवाबनवी करणाऱ्या 'देवमाणसा'चा 'हृदयी वसंत...' वर भन्नाट डान्स, पाहा VIDEO
मायराच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रटींनीही कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्निलला मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. मायरा ही मोठी, तर राघव लहान आहे. दोघांचेही फोटो तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सतत निरनिराळ्या पोस्ट तो चाहत्यांसोबत शेअर करतो.
View this post on Instagram
स्वप्निल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात गेस्ट म्हणून दिसत आहे. याशिवाय त्याचा बहूचर्चित ‘बळी’ (Bali) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच ‘समांतर 2’ (Samantar 2) या वेबसीरिजमध्येही तो दिसणार आहे. ‘समांतर’चं पहिलं पर्व हीट ठरंल होतं. आता दुसऱ्या पर्वात नेमकं काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.