दिवाळी पहाटला आजीबाईंचा धम्माल डान्स, स्वप्नील जोशीनं शेअर केलेला VIDEO एकदा पाहाच

वय विसरुन धम्माल डान्स करणाऱ्या या आजीबाईंच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह काही औरच आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 05:00 PM IST

दिवाळी पहाटला आजीबाईंचा धम्माल डान्स, स्वप्नील जोशीनं शेअर केलेला VIDEO एकदा पाहाच

मुंबई, 31 ऑक्टोबर : नुकतीच देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिवाळसणाला अगदी लहानांपासून ते थोर-मोठ्यांपर्यंत सर्वांचा उत्साह पाहायला मिळतो आणि आनंद साजरा करण्यासाठी वयाचं बंधन अजिबात नसतं. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ असाच काहीसा संदेश देतो. स्वप्नीलनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजीबाई मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. आपलं वय विसरुन धम्माल डान्स करणाऱ्या या आजीबाईंच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह काही औरच आहे. हा व्हिडीओ शेअर करताना स्वप्नीलनं लिहिलं, ‘दिवाळी पहाट कार्यक्रमातील गाण्यावर एका आजींनी धरला ताल. आजींच्या या उत्साहाला सलाम बॉस. आनंद लुटायला वयाचं बंधन नसतं आणि काळाचंही.’

लग्न-बर्थडे पार्टीमध्ये मनोरंजन करण्यास रणवीर सिंह तयार, दीपिका म्हणते...

Loading...

 

View this post on Instagram

 

दिवाळी पहाट कार्यक्रमातील गाण्यावर एका आजींनी धरला ताल. आजींच्या या उत्साहाला सलाम बॉस. ❤️ आनंद लुटायला वयाचं बंधन नसतं आणि काळाचंही. #notmycontent #aajjibairocks #salute #dance #enjoy

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘मोगरा फुलला’ या स्वप्नीलच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या नीना कुलकर्णी, सई देवधर, आनंद इंगळे आणि बऱ्याच मराठी कलारांच्या भूमिका होत्या. सध्या तरी स्वप्नीलकडे कोणताही नवा सिनेमा नाही. मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय ठरलेला स्वप्नील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो.

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

'..स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

==============================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...