मुंबई 21 मे : मराठी सिनेसृष्टीतील जोडगोळी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांनी आजवर अनेक चित्रपटांतून चाहत्यांच मन जिंकलं आहे. मुंबई- पुणे - मुंबई (Mumbai- Pune- Mumbai) या चित्रपटातून ही जोडी उदयास आली. त्यानंतर अनेक हीट चित्रपट त्यांनी दिले. पण त्यांचाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस होऊन गेला. यानिमित्त अभिनेता स्वप्निल जोशीने मुक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक त्यांचाच एक जुना व्हिडीओ शेअर केला. पण त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे. यात स्वप्निल आणि मुक्ता एकमेकांशी संवाद साधत आहेत. व त्या दरम्यान ते एकमेकांशी निखळ हसत आहेत. यावर त्यांच्या अनेक चाहत्यांना कमेंट्स देखिल केल्या आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनाही यावर कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
मुक्ता आणि स्वप्निल यांची मैत्री कोणापासूनही लपलेली नाही. ते एकमेकांचे फार चांगले मित्र-मैत्रिण आहेत. याशिवाय अनेक चित्रपट त्यांना एकत्र केले आहेत. व त्यांची ही जोडी प्रेक्षकांनाही फार आवडते. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ पासून सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘मंगलअष्टके वन्समोर’, ‘मुंबई- पुणे-मुंबई 2’, आणि ‘मुंबई – पुणे – मुंबई 3’ असे हीट चित्रपट त्यांनी दिले आहेत.
महेश्वरी साडीत खुललं राधिकाचं सौंदर्य; पाहा अनिताचा मराठमोळा साज
याशिवाय प्रेक्षकांना या जोडीला आणखी चित्रपटांत पाहण्याची इच्छा आहे. मुक्ता आणि स्वप्निल दोघांनीही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वप्निल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. व असे व्हिडिओज आणि फोटोज तो शेअर करत असतो.
स्वप्निल सध्या झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात दिसत आहे. त्यात तो एक गेस्ट म्हणून भूमिका साकारत आहे. तर मुक्ता ही मागिल वर्षी ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात दिसली होती. त्यासाठी तिला फिल्मफेअर मराठी हा पुरस्कार देखिल मिळाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.