सुशांंतच्या बहिणीने 'न्याय' मिळण्यासंदर्भात सोशल मीडियावर केली महत्त्वाची पोस्ट

सुशांंतच्या बहिणीने 'न्याय' मिळण्यासंदर्भात सोशल मीडियावर केली महत्त्वाची पोस्ट

श्वेता सिंह किर्तीच्या या पोस्टवर सातत्याने चाहते कमेंट्स करत आहे. कमेंटमध्ये त्यांनी आनंद व्यक्त केला आहे की, शेवटी सुशांतच्या परिवाराने पुढे येत याबाबत मौन सोडले आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर सातत्याने मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सुशांतसाठी न्यायाची मागणी केली आहे.

सुशांतबाबत त्याच्या परिवाराच्या अनेक आठवणी आहे. 4 बहिणींमध्ये असणारा हा एक भाऊ व्रतवैकल्य करून झाल्याची बाब ही काही मीडिया अहवालांनी सांगितली होती. त्याचे कुटुंबीय त्याच्या आठवणीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भावुक होत आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी याबाबत मौन सोडल्यानंतर हे प्रकरण आता वेगळ्या मार्गावर जाऊ लागले आहे. सुशांतच्या बहिणीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा पोलिसांच्या चौकशीस सुरुवात- सूत्र)

सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर तिने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये श्वेताने सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते आहे की, 'जर सत्यामुळे काही फरक पडणार नसेल, तर कशामुळेच पडणार नाही #justiceforsushantsinghrajput'.

View this post on Instagram

If truth doesn’t matter, nothing ever will! #justiceforsushantsinghrajput

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

श्वेता सिंह किर्तीच्या या पोस्टवर सातत्याने चाहते कमेंट्स करत आहे. कमेंटमध्ये  त्यांनी आनंद व्यक्त केला आहे की, शेवटी सुशांतच्या परिवाराने पुढे येत याबाबत मौन सोडले आहे.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रियावर टांगती तलवार, बिहार पोलीस करणार अटक?)

सुशांतच्या आत्महत्येबाबत त्याचे अनेक चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. मात्र त्याचे कुटुंबीया याआधी शांत असल्यामुळे चाहत्यांमध्येही अस्वस्थता होती. मात्र कुटुंबाकडून सीबीआय चौकशीची मागणी का होत नाही आहे, याबाबत देखील श्वेताने स्पष्टीकरण दिले आहे. एका व्यक्तीने श्वेताच्या पोस्टवर अशी कमेंट केली होती की, 'तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी का करत नाही आहेत. जर तुमच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली तर पूर्ण देश तुम्हाला पाठिंबा देईल. फक्त चाहते मागणी करत आहेत, त्यामुळे सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहेत. मात्र असे अनेक पुरावे आहेत, ज्यामुळे हे सिद्ध होत आहे की सुशांतचा मृत्यू एका कटामुळे झाला होता.' दरम्यान याचे उत्तर देताना श्वेताने स्पष्टीकरण दिले आहे की, तिच्या परिवाराकडून अद्याप सीबीआय चौकशीची मागणी का केली गेली नाही आहे.

(हे वाचा-सुशांतला वेडं ठरवून त्याचा पैसा लुटायचा रियाचा होता डाव; वडिलांचा गंभीर आरोप)

चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता म्हणाली की, 'आम्ही मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होण्याचा आणि त्यासंदर्भात त्यांचा अहवाल समोर येण्याची वाट पाहत आहोत.

सुशांतच्या परिवाराने मंगळवारी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात कलम 306 /341 / 342 /380 /406 /420 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. पाटणा पोलिसांची 4 सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. अशी शक्यता आहे की, गरज पडल्यास पाटणा पोलीस रिलाया याप्रकरणी ट्रांझिट रिमांडमध्ये आणू शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 29, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या