Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा जेवण करत होते वडील, टीव्ही लावला आणि...

सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा जेवण करत होते वडील, टीव्ही लावला आणि...

सुशांत सिंह राजपूतने केरळमध्ये आलेल्या पूराच्या वेळी पीडितांसाठी 1 कोटी 25 लाख रुपये दान केले होते.

सुशांत सिंह राजपूतने केरळमध्ये आलेल्या पूराच्या वेळी पीडितांसाठी 1 कोटी 25 लाख रुपये दान केले होते.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

    पटना, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)मुंबईत त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सुशांत मुंबईत राहत असला तरी तो मुळचा बिहारचा आहे. न्यूज 18च्या मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्येबाबत त्याच्या वडिलांना माहिती नव्हती. ते जेवत असताना, त्यांना ही बातमी कळली, त्यानंतर त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या लक्ष्मी यांनी टीव्ही लावला. सुशांत सिंह हा मूळचा बिहारचा असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या वडिलोपार्जित घरीही आला होता. तो मूळचा पूर्णियामधील बधारा कोठी येथील मालडीहाचा रहिवासी होता. 2002 साली सुशांतच्या आईचे निधन झाल्यानंतर सुशांतचे बाबा तेथेच राहत होते. सुशांतच्या मानसिक आजाराबाबत त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे सुशांतच्या जाण्यानं त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे. वाचा-सुशांत सिंह ब्रेकअप नंतर खचला होता; गर्लफ्रेंडपासून या कारणाने झाला होता वेगळा त्यांच्या घरी काम करणाऱ्या लक्ष्मी यांनी न्यूज 18ला दिलेल्या एक्सक्युझिव्ह माहितीत, सुशांत लहान असल्यापासून त्या तिथं काम करत आहेत. जेव्हा सुशांतनं आत्महत्या केली, तेव्हा त्याचे बाबा जेवत होते. अचानक ही बातमी कळल्यानंतर त्यांना काहीच कळलं नाही. ते रडायला लागले, अखेर लक्ष्मीनं त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. वाचा-सुशांतने चंद्रावर खरेदी केलेली जागा; 'त्या' ठिकाणी जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं बिहारच्या या उगवत्या स्टारने होली रिलेशनशिप या मालिकेद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एमएस धोनी व्यतिरिक्त, काय पो चे, शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ आणि त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगची मॅनेजरनंही आत्महत्या केली होती. वाचा-एका आठवड्याआधीच सुशांतनं दिले होते आत्महत्येचे संकेत? आईबाबत अखेरची भावनिक पोस्ट सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करत असायचा, मात्र त्याची अखेरची पोस्ट ही खास होती. त्यानं आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यात त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून, "अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई", अशी भावनिक कविता शेअर केली होती. वाचा-अभिनेता सुशांतसिंह राजपूतने का केली आत्महत्या? मुंबई पोलिसांचा खुलासा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या