मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Suniel Shetty ने गेल्या 8 वर्षात खाल्ल्या नाही 'या' गोष्टी; कारणही आहे खास

Suniel Shetty ने गेल्या 8 वर्षात खाल्ल्या नाही 'या' गोष्टी; कारणही आहे खास

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी

अभिनेता सुनील शेट्टी हे बी-टाऊनमधील सतत चर्चेत असणरं नाव आहे. सुनील शेट्टी कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 9 डिसेंबर : अभिनेता सुनील शेट्टी हे बी-टाऊनमधील सतत चर्चेत असणरं नाव आहे. सुनील शेट्टी कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. वयाच्या 62 व्या वर्षीही अभिनेता फीट आणि तरुण दिसतो. त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते असून त्याच्या फिटनेस टीप्स अनेकजण फॉलो करताना दिसून येतात. त्याच्या फीटनेस व्हिडीओवरही चाहते कमेंट करत त्याचं फिटनेस सिक्रेट विचारत असतात. अशातच फिटनेससाठी सुनील शेट्टी गेल्या 8 वर्षापासून एक गोष्ट करत आहे. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण ही गोष्ट खरी असून तो नेमकं काय करतोय हे पाहूया.

सुनील शेट्टीने त्याच्या फिटनेसविषयीची एक खास गोष्ट आज तकसोबत बोलताना सांगितली. सुनील म्हणाला, मी रात्री कितीही उशीरा झोपलो तरी माझा प्रयत्न असतो की मी 6 ते 6.30 पर्यंत उठू. कारण फीटनेसच्या रुटीनमध्ये मी कोणतीही तडजोड करु शकत नाही. आहाविषयी बोलताना सुनील म्हणाला, मी नेहमीच मोजूनच खातो. मी कधीच जास्त प्रमाणात जेवण करत नाही. माझे पोट भरले नाही तरी मी कमीच खातो. मी माझ्या आयुष्यातील पांढऱ्या गोष्टींना बाय बाय म्हटलोय. मी मीठ, भात, साखर, दूध या पांढऱ्या गोष्टींचा मी त्याग केली आहे.

सुनील शेट्टी पुढे सांगतो, साखर म्हणजे माझ्यासठी फळे आहेत. मला चहाचे व्यसन आहे. मी दिवसभरातून दोनदा चहा पितो. फक्त तेवढंच साखरेचं सेवन होतं. मीठा ऐवजी मी रॉक सॉल्ट वापरतो. मी लक्टोज फ्री दूध पिऊ शकतो. मी पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खातो. मी दररोज जीम करतो आणि जीममध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकतो. माझ्या फीट शरीराचे रहस्य म्हणजे, आरोग्यदायी अन्न आणि रोजचा व्यायाम.

दरम्यान, उत्तम अभिनेता असण्यासोबतच सुनील एक पोड्युसर देखील आहे. जवळपास 30 वर्षाच्या करिअरमध्ये अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जास्त करुन सुनीलने अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचे आजही खूप चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली एक ओळख बनवली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Fitness, Sunil shetty