Home /News /entertainment /

VIDEO: 'मुंबईकर मुंबई बाहेर जातील... ' अभिनेता सुमीत राघवनची नवी पोस्ट पुन्हा चर्चेत

VIDEO: 'मुंबईकर मुंबई बाहेर जातील... ' अभिनेता सुमीत राघवनची नवी पोस्ट पुन्हा चर्चेत

नुकतंच अभिनेता सुमीत राघवनने आपल्या ट्विटर हँडलवरून (Twitter) पोस्ट शेअर करत एक प्रश्न उपस्थित केला आहे.

    मुंबई, 1 मार्च-   प्रसिद्ध अभिनेता   (Actor)  सुमीत राघवन   (Sumeet Raghvan)  नेहमीच आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखला जातो. अभिनेता सतत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर पोस्ट लिहून संबंधित व्यक्तींना जाब विचारत असतो. सध्याही असंच काहीसं झालं आहे. नुकतंच अभिनेता सुमीत राघवनने आपल्या ट्विटर हँडलवरून (Twitter)   पोस्ट शेअर करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. सुमीत राघवन पोस्ट-(Sumeet Raghvan Post) अभिनेता सुमीत राघवनने एक व्हिडीओ शेअर करत मुंबईच्या सद्यस्थितीवर लिहिलं आहे, 'बहुचर्चित मेट्रो कारशेड तुम्ही स्थलांतरित केलं. परंतु दहिसर टोलनाका आणि त्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील बेकायदेशीर दुकाने उठवण्यात आलेली नाहीत. सुमीतने मुंबई महानगरपालिकेला टॅग करत आणि तिखट शब्दात फिरकी घेत पुढं म्हटलं आहे, ' हे जर असंच सुरु राहिलं तर मुंबईकर मुंबई सोडून बाहेर स्थलांतरित होतील. मग तुम्ही अतिक्रमण असलेल्या या जगात शांततापूर्ण जीवन जगू शकाल. सुमीतने व्हिडीओमध्ये पुढं म्हटलं आहे, 'बेकायदेशीर दुकाने असलेल्या या लोकांना कशी काय परवानगी मिळते काय माहित? कारण माझ्या मते तीन दिवसांपूर्वी ही दुकाने काढून टाकण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा हे लोक इथे आलेले आहेत. तसेच अभिनेता पुढं म्हणाला, 'माझी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा'. अभिनेता सुमीत राघवन हा टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आजपर्यँत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही तो सक्रिय आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर, आपला माणूस, संदूक या चित्रपटांमध्ये अभिनेत्याने महत्वाची भूमिका साकारली आहे. सुमीत राघवन 'वागळे की दुनिया' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचला होता. या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना फेम अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेत त्याची सहअभिनेत्री होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Actor, Marathi entertainment, Mumbai, Twitter

    पुढील बातम्या