मोठी बातमी! अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

मोठी बातमी! अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : बीग बी अमिताभ बच्चन, जेनेलिया यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना शिरल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.

'मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा' असं ट्वीट अभिनेता सुबोध भावेनं केलं आहे.

हे वाचा-SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहेत. 'सुबोध दादाची गोष्ट' लहान मुलांमध्ये खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सुबोध भावे आणि त्यांचं कुटुंबीय कोरोनातून लवकर बरं व्हावे यासाठी लहानांपासून अनदी वयोवृद्धांपर्यंत त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 31, 2020, 1:43 PM IST

ताज्या बातम्या