• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘मुठ्ठी खोल के तो देख...’ सोनू सूदचं चाहत्यांना प्रेरणादायी आवाहन

‘मुठ्ठी खोल के तो देख...’ सोनू सूदचं चाहत्यांना प्रेरणादायी आवाहन

ट्वीटच्या माध्यामातून सोनूने चाहत्यांना गरजूंच्या मदतीसाठी साद घातली आहे. रोज तो नवनवीन ट्विट्स करून त्याच्या चाहत्यांना इतरांच्या मदतीसाठी आवाहन करत असतो. (Sonu sood tweeted)

 • Share this:
  मुंबई 22 एप्रिल : देशभरात दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोजच रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पहायला मिळत आहे. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या या कठीण काळात तो लोकांची मदत करत आहे. तर आता तो स्वत: देखिल कोरोना संक्रमित झाला आहे. त्याने स्वत:ला आयसोलेट केलं आहे. पण तरीही त्यांच मदतकार्य सुरूच आहे. आता त्याने चाहत्यांसाठी एक प्रेरणादायी ट्विट केलं आहे. सोनू या ट्विट मध्ये म्हणतो, ‘मुट्ठी खोल के तो देख.. शायद तेरी हाथ की लकीरों में किसी की जान बचाना लिखा हो।‘ या ट्विटच्या माध्यामातून त्याने चाहत्यांना गरजूंच्या मदतीसाठी साद घातली आहे. रोज तो नवनवीन ट्विट्स करून त्याच्या चाहत्यांना इतरांच्या मदतीसाठी आवाहन करत असतो. (Sonu sood tweeted) याशिवाय सोनूचं त्याच्या फाउंडेशनतर्फे लोकांच्या मदतीच कार्य सुरू आहे. निरनिराळ्या प्रकारे तो लोकांची मदत करतो. कोणाला शैक्षणिक तर कोणाला आर्थिक तर कोणाला वैद्यकिय पद्धतीची मदत तो करतो. त्याची माहिती तो ट्विट करत पोहोचवतो. व मदत मिळाल्यानंतर लोकही त्याला ट्विट करत धन्यवाद देतात.

  हे वाचा - Radhe साठी सलमान खानने मोडला आपलाच नियम, दिशा पटानीला केलं KISS; VIDEO पाहून थक्क झाले चाहते

  सध्या कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत अनेक रुग्णांना बेड मिळण्यास तसेच ऑक्सिजन मिळण्यासही कठीण झाल  आहे. सोनू ने 193 लोकांना आतापर्यत बेड मिळवून दिले आहेत. 93 लोकांना ऑक्सिजन सिलेंडर मिळवून दिले आहेत. याशिवाय रेमिडिसिवर औषधांचाही साठा हा कमी पडत आहे. त्याने 83 लोकांना हे औषध मिळवून देण्यास मदत केली आहे. याशिवाय सोनूने अँटी कोरोना व्हॅक्सिन घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेत नेटवर्क 18 (Network 18) आणि फेडरल बँक (federal bank) यांचाही सहभाग आहे.
  Published by:News Digital
  First published: