मुंबई 27, ऑक्टोबर: लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)ने अनेक गरीब मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. वेळेला त्यांना अन्नही पुरवलं. त्यामुळे सोनू सूदबद्दल अनेकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. काही लोक त्याला 'देव माणूस' म्हणायला लागले तर काहींनी त्याला 'रिअल हिरो' अशी उपमा दिली. पण काही लोकं अशीही आहेत ज्यांनी सोनू सूदच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सोनू सूदने केलेली मदत म्हणजे प्लब्लिसिटी स्टंट होता असा आरोप ट्विटरवरुन काही लोकांनी केला आहे.
सोनू सूदच्या मदतीबाबत एका ट्विटर युझरने प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी स्नेहल नावाच्या एका ट्विटर युझरने आजारी मुलाची मदत करण्याची मागणी सोनू सूदकडे केली होती. सोनूनेही मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण या स्नेहल नावाच्या युझरने सोनू सूदला तिच्या ट्वीटमध्ये टॅग केलं नव्हतं. तिचं ट्विटर अकाऊंटही नवीनच आहे. मग सोनू सूदला कसं समजलं की या व्यक्तीने त्याच्याकडे मदत मागितली आहे? असा सवाल एका नेटकऱ्याने केला. मग काही युझर्सनेदेखील त्याची बाजू घेतली.
That’s the best part brother.I find a needy & they somehow find me. It’s about
“INTENTIONS”, but u won’t understand.Tom patient will be in SRCC Hospital kindly do ur bit. Send some fruits for him.Someone with 2-3 followers will be happy to get some love from a man with followers https://t.co/f7Hhqrv95Xpic.twitter.com/sObQBJdUuO
सोनूच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं पण सोनू सूदही गप्प बसला नाही. त्याने या व्यक्तीला मदत केल्याचे सगळे पुरावे सादर केले. आणि त्याला म्हटले, "हीच तर चांगली गोष्ट आहे ना की, एका गरजू व्यक्तीला मी शोधून काढलं. ही फार मोठी गोष्ट नाही. कोणतही काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. पण तुला ते समजणार नाही तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तूही त्याला हॉस्पिटलमध्ये फळं पाठवून दे" अशाप्रकारे सोनू सूदने या नेटकऱ्याला सणसणीत उत्तर देत त्याला गप्प बसवलं आहे.