Home /News /entertainment /

सोनू सूद मांडणार बळीराजाची व्यथा; राज शांडिल्य यांनी केली 'किसान' सिनेमाची घोषणा

सोनू सूद मांडणार बळीराजाची व्यथा; राज शांडिल्य यांनी केली 'किसान' सिनेमाची घोषणा

सोनू सूद (Sonu Sood) राज शांडिल्य यांच्या आगामी 'किसान' या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. आयुष्मान खुरानाचा सिनेमा ड्रीम गर्लचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राज शांडिल्य (Raj Shandilya) या सिनेमा संबंधित ट्वीट करुन अधिकृत घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 05 जानेवारी : कोरोना व्हायरसच्या (Covid 19) काळात देशातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अनेक लोकांचा रोजगार गेला आणि उपासमारीची वेळ आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आपल्या परीने या नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे देशभरातील नागरिकांना तो एखाद्या देवासारखा वाटू लागला आहे. याचा त्याच्या चित्रपटातील कारकिर्दीवर देखील प्रभाव पडत असून त्याला सकारात्मक भूमिका मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला तो नकारात्मक भूमिका करत होता. सोनू सूद (Sonu Sood) च्या नवीन चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे. सोनू राज शांडिल्य यांच्या आगामी 'किसान' या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. आयुष्मान खुरानाचा सिनेमा ड्रीम गर्लचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राज शांडिल्य (Raj Shandilya) या सिनेमा संबंधित ट्वीट करुन अधिकृत घोषणा केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी  हमारे किसान, देश की शान. माझ्या आगामी सिनेमाची घोषणा करत आहे. सिनेमात सोनू सूदची मुख्य भूमिका आहे. ईश्वर निवास या सिनेमाचं दिग्दर्शन करेल. राज शांडिल्य (Raj Shandilya) या सिनेमाची निर्मिती करतील. असे ट्वीट करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच सोनू सूद (Sonu Sood) नवीन चित्रपटात दिसणार आहे. नुकताच सोनू सूद अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात गेला होता. यावेळी त्याच्या 'मैं मसीहा नही हूँ' या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं होतं. सोनूने या पुस्तकामध्ये लॉकडाऊनदरम्यान त्याला आलेले अनुभव शेअर केले आहेत. दरम्यान, या सिनेमाची माहिती समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan) यांनी ट्वीट करत यासंबंधी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये 'ई निवास द्वारे दिग्दर्शित आणि सोनू सूद अभिनित किसान सिनेमाला खूप शुभेच्छा असं म्हटलं आहे. किसान या सिनेमातील इतर कलाकारांबाबत अजून माहिती समोर आलेली नसून लवकरच यामध्ये कुणाकुणाच्या भूमिका आहेत याची माहिती समोर येणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Sonu Sood

    पुढील बातम्या