सुपरहिरो नव्हे देवदूतच; मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी गाय विकणाऱ्या कुटुंबासाठी धावून आला सोनू

कोरोना काळात अभिनेता सोनू सूदचं (sonu sood) गरीबांसाठी मदतकार्य सुरूच आहे.

कोरोना काळात अभिनेता सोनू सूदचं (sonu sood) गरीबांसाठी मदतकार्य सुरूच आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 जुलै : बॉलिवूडमध्ये खलनायक ठरलेला अभिनेता सोनू सूद (sonu sood) प्रत्यक्ष आयुष्यात खरा सुपरहिरो ठरला आहे. कोरोना काळात अनेक गरजूंसाठी तो देवदूतच बनून आला आहे. आधी मुंबईतील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवलं, त्यांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं, काहींना छत दिलं आणि आता तर तो मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी (online education) गाय (cow) विकणाऱ्या कुटुंबासाठीही धावून आला आहे. कोरोना काळात सध्या शाळेतल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण दिलं जातं आहे. यासाठी गरजेचा आहे तो मोबाइल. आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल हवा यासाठी हिमाचल प्रदेशच्या गरीब कुटुंबानं आपली गाय विकली आणि त्यातून आलेल्या पैशांतून त्यांनी मोबाइल घेतला. सोनूला ही बातमी समजताच या कुटुंबाच्या मदतीसाठी त्याने पुढाकार घेतला आहे. सोनूने ट्वीटरवर ही बातमी पाहिल्यानंतर तात्काळ या कुटुंबाची माहिती मागितली आहे आणि या कुटुंबाला गाय परत मिळवून देण्याचा निश्चय केला आहे. हे वाचा - सोनू सूदचा मजुरांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अ‍ॅप काही दिवसांपूर्वीच सोनू सूदने मुंबई पोलिसांना 25,000 फेस शिल्डची मदत केली आहे. त्याआधी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 28000 लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरविले आहेत. त्याचप्रमाणे गरजूंना अन्नधान्य, रेशन देण्याचे कामही सोनू करत आहे. सोशल मीडियावर सोनूचे खूप कौतुक देखील होत आहे. सोनू सूद कोरोनाव्हायरसच्या साथीत गरजू लोकांना मदत करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. लॉकडाऊन दरम्यान परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मदत केल्याच्या अनुभव सांगणारे पुस्तकदेखील तो लिहिणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published: