'तुला लवकरच अटक होईल', सोनू सूदच्या नावाने फसवणूक करणाऱ्याला अभिनेत्याचा इशारा

'तुला लवकरच अटक होईल', सोनू सूदच्या नावाने फसवणूक करणाऱ्याला अभिनेत्याचा इशारा

कोरोना काळात अनेकांच्या मदतीस धावून गेलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या नावाने देखील फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येत आहे.

  • Share this:

लमुंबई, 22 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्यांच्या नावाने होणारी फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. याआधी सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akhay Kumar) त्याचप्रमाणे शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)च्या नावाने देखील फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता कोरोना काळात अनेकांच्या मदतीस धावून गेलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या नावाने देखील फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना मदत करत आहे. अशावेळी त्याच्या नावाने सोशल मीडियावर लोकांना धोका दिला जात आहे. नुकतेच त्याने याबाबतील एक ट्वीट करत अशी फसवणूक करणाऱ्याला इशारा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला राग तेव्हा आला जेव्हा त्याला हे माहित झाले की, त्याच्या नावाने फेक अकाउंट चालवले जात आहे. यानंतर अभिनेत्याने कडक शब्दात फेक अकाउंट चालवणाऱ्या इशारा दिला आहे. त्याने असे लिहिले आहे की- 'निष्पाप लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाल तुला लवकरच अटक केली जाईल. तर यामुळे उशीर होण्याआधी सुधार'.

दरम्यान हे पहिल्यांदा नाही की, सोनू सूदच्या नावाने असा प्रकार केला जात आहे. याआधी देखील सोनूच्या नावाने अनेक फेक ट्वीट समोर आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली होती. ज्यानंतर अनेक कलाकारांनी समोर येत त्यांच्या चाहत्यांना सांगावे लागले होते की, कोणते अकाउंट फेक आहे आणि कोणते खरे. जेणेकरून त्यांची फसवणूक होऊ नये.

(हे वाचा-ट्रोलिंगनंतर महेश भट्ट यांच्याबरोबरच्या नात्याचा रियाने केला होता खुलासा)

कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने फक्त लॉकडाऊनमुळेच नाही तर नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्यांसाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ, बातम्या पाहूनही त्याने गरजूंना मदत केली. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील (chhattisgarh) अशाच एका पूरग्रस्त विद्यार्थीनीसाठी सोनू सूद धावून आला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 22, 2020, 3:33 PM IST
Tags: Sonu Sood

ताज्या बातम्या