मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

sidharth shukla च्या मृत्यूची बातमी ऐकून तरुणी गेली कोमात, डॉक्टरांनी दिली माहिती

sidharth shukla च्या मृत्यूची बातमी ऐकून तरुणी गेली कोमात, डॉक्टरांनी दिली माहिती

सिद्धार्थची एक तरुण फॅन त्याच्या अचानक जाण्याचं दुःख पचवू शकली नाही. जबरदस्त मानसिक धक्का बसून ती अंशतः कोमात गेली आहे.

सिद्धार्थची एक तरुण फॅन त्याच्या अचानक जाण्याचं दुःख पचवू शकली नाही. जबरदस्त मानसिक धक्का बसून ती अंशतः कोमात गेली आहे.

सिद्धार्थची एक तरुण फॅन त्याच्या अचानक जाण्याचं दुःख पचवू शकली नाही. जबरदस्त मानसिक धक्का बसून ती अंशतः कोमात गेली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 03 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 13 (Bigg Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (sidharth shukla death) निधनानंतर चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थचे लाखो चाहते आहेत, जे त्याच्या खूप प्रेम करायचे. अनेक चाहते त्याच्या अशा अचानक जाण्यानं आश्चर्य व्यक्त करत आहेत. सिद्धार्थचा मित्र डॉ. जयेश ठकारने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक चाहती त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. त्यानं ट्विट करून अशा चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

जयेशने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करून लिहिलं आहे की, 'मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला, एकटे राहू नका, सिद्धार्थच्या एका चाहत्या मुलीला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, कारण ती वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली .. कृपया स्वतःची काळजी घ्या.. तिच्यासाठी प्रार्थना करा !! '

यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या ट्विटमध्ये आणखी एक खुलासा केला की, 'सिद्धार्थची एक चाहता अर्धवट कोमात गेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, जास्त ताणामुळे माणूस असा अंशत: कोमात जाऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक चाहत्यानं आता सावरायला हवं. शांत व्हा, झालेल्या घटनेचा जास्त विचार करणं थांबवावं आणि तुमचं मन विचलित होऊ देऊ नये. हे सोपं नाही, हे मला माहीत आहे. पण स्वतःला जपावं.'

हे वाचा - Bra आणि जॅकेट घालून एअरपोर्टवर पोहोचली अभिनेत्री; नेटिझन्स म्हणाले ही कसली फॅशन?

प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Bigg Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनेक आठवणी सध्या त्याचे चाहते शेअर करताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. आज मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार होणार आहेत. प्रथमदर्शनी डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आले आहेत.

First published:

Tags: Heart Attack, Sidharth shukla