Home /News /entertainment /

Siddharth Jadhav Divorce: घटस्फोटांच्या चर्चांवर भडकला सिद्धार्थ जाधव! म्हणाला सगळं काही...

Siddharth Jadhav Divorce: घटस्फोटांच्या चर्चांवर भडकला सिद्धार्थ जाधव! म्हणाला सगळं काही...

Siddharth Jadhav Divorce: घटस्फोटांच्या चर्चांवर भडकला सिद्धार्थ जाधव! म्हणाला सगळं काही...

Siddharth Jadhav Divorce: घटस्फोटांच्या चर्चांवर भडकला सिद्धार्थ जाधव! म्हणाला सगळं काही...

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या काही दिवसांपासून पत्नी तृप्तीबरोबर घटस्फोटाच्या बातमीनं चर्चेत आला होता. पण अखेर सिद्धार्थनं त्याच्या घटस्फोटोबाबत मौन सोडलं आहे.

    मुंबई, 23 जून:  प्रेक्षकांचा लाडका 'आपला सिद्धू' म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Siddharth Jadhav ) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार ( Siddharth Jadhav  Wife Trupti) यांच्यात दुरावा निर्माण झाला असून त्यांनी घटस्फोट ( Siddharth Jadhav Divorce)  केल्याच्या चर्चां सुरू होत्या. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलेलं असताना अभिनेता सिद्धार्थ जाधवनं या सगळ्यावर चांगलाच राग व्यक्त केला असून 'सब कुछ ठिक है' असं म्हणत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सिद्धार्थनं ही माहिती दिली आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटाच्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सिद्धार्थ त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाला,  'अशा अफवा कोण पसरवतं मला माहिती नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठिक आहे'. मागच्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी वेगळं राहत असल्याचं म्हटलं जात होतं. यावर बोलताना सिद्धार्थनं 'सबकुछ ठिक हैं', असं म्हणत जास्त बोलण्यास नकार दिला. यावरुन तरी सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्यात खूश असल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा - 'एक पाऊल नव्या साहसाच्या दिशेने...'; मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली 'ती' खास पोस्ट असं असलं तरी सिद्धार्थ नुकताच दुबई ट्रिप करुन आला. सिद्धार्थ मुली स्वरा आणि इरा यांच्याबरोबर दुबईला गेला होता. मुलींबरोबरचे फोटो देखील त्यानं शेअर केले होते. मात्र याच पत्नी तृप्ती कुठेही दिसली नाही. ती का गेली नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आजही पडला आहे. त्याचप्रमाणे ई टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्ष सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र राहत नाहीत. दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर दोघांनी दोन वर्षात एकमेकांबरोबर एकही पोस्ट किंवा फोटो शेअर केलेली नाही. मात्र सिद्धार्थच्या या स्पष्टीकरणानंतर या सगळ्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सिद्धार्थच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर सिद्धार्थ सध्या त्याच्या करिअरच्या पिक पॉईंटला आहे.  काही दिवसात सिद्धार्थचा 'तमाशा लाईव्ह' ( Tamasha Live) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे धनाजी गँग घेऊन 'दे धक्का 2' ( De Dhakka 2) या सिनेमातही सिद्धार्थ आपल्याला दिसणार आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या