मुंबई, 23 सप्टेंबर 2021 : प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव
(Siddhartha Jadhav) याचा सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मराठी बिग बॉसच्या
(Bigg Boss Marathi 3) सेटवरील आहे. यामध्ये सिद्धार्थ सुटा बुटात दिसत आहे. त्याच्या या बिग बॉस लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या लूकसाठी सिद्धार्थ काय काय केले त्याचे इन्स्टा रील सिद्धार्थने
(Siddharth Jadhav Viral video ) नुकतेच शेअर केले आहे. प्रेक्षकांनी त्याच्या या रीलला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे व त्याच्या हटके लूकसाठी आणि विशेष म्हणजे त्याच्या केसाच्या पोनीटेलचे देखील कौतुक केले आहे.
महेश मांजरेकर यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव मराठी बिग बॉसचा सीजन तीसरा होस्ट करताना दिसला. यानंतर सगळ्यांनी सिद्धार्थ जाधवच्या या नव्या लूकची प्रशंशा केली. सिद्धार्थाने मराठी बिग बॉसच्या सेटवर एकदम ढासू एन्ट्री केली. यावेळी त्याची हेअरस्टाईल सर्वांचे लक्षवेधून घेत होती. शाहरूख खान स्टाईल सिद्धार्थाने देखील छोटीशी केसांची पोनीटेल बांधाली होती. सोबत सूट आणि बूट असा काही न्यारा रूबाब सिद्धार्थाचा बिग बॉसच्या सेटवर पाहण्यास मिळाला.
वाचा : 'Mazhi Tuzhi Reshimgaath' फेम शेफालीचे Mumbai Indians संघासोबतचे PHOTO व्हायरल; काय आहे कनेक्शन?
सिद्धार्थच्या याच हेअरस्टाईलसाठी केसांचे किती आणि काय अणे कसे कसे करावे लागले याच एख रील सिद्धार्थ जाधवने शेअर केले आहे. आया है राजा लोगो रे लोगो.. असे त्याने हे रील शेअर करत म्हटले आहे. यापूर्वी सिद्धार्थ जाधवचा बिग बॉसच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महेश मांजरेकर यापूर्वी एकटेच शो होस्ट करत होते मात्र आत त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव देखील दिसणार आहे.
यंदा मराठी बिग बॉसच्या घरात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.