Home /News /entertainment /

‘हे अ‍ॅप पाहा अन् करा कलाकारांची मदत’; श्रेयस तळपदेची मराठी रंगभूमीसाठी अनोखी युक्ती

‘हे अ‍ॅप पाहा अन् करा कलाकारांची मदत’; श्रेयस तळपदेची मराठी रंगभूमीसाठी अनोखी युक्ती

अनेक कलाकार या काळात बेरोजगार झाले आहे. चित्रिकरण थांबल आहे. रंगभूमीवर वरील म्हणजेच थिएटर आर्टिस्टना (theatre artists) मोठं नुकसान सहन कराव लागत आहे. या साठीच अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 20 मे : सध्याचा लॉकडाउनचा (Lockdown) काळ अनेक क्षेत्रांना मारक ठरत आहे. त्यात कलाकारांना याचा विशेष फटका बसत आहे. अनेक कलाकार या काळात बेरोजगार झाले आहे. चित्रिकरण थांबल आहे. रंगभूमीवर वरील म्हणजेच थिएटर आर्टिस्टना (theatre artists) मोठं नुकसान सहन कराव लागत आहे. वर्षभरापासून नाट्यगृह बंद आहेत. मधल्या काही काळात ती 50% च्या उपस्थितीने सुरू झाली पण पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला. या साठीच अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. मागील लॉकडाउन मध्ये श्रेयसने त्याचं ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर ‘नाइन रस’ (Nine Rasa) हे ऍप लाँच केलं होत. हा ओटीटी प्लॅटफॉर्म नाटक, लाईव्ह परफॉर्मन्सेस, कथा कथन (Storytelling) तसेच स्टॅन्डअप शो (Standup show) अशा प्रकारच्या शो साठी हा प्लॅटफॉर्म उपयोगी पडणार आहे. श्रेयसने विशेषतः स्टेज आर्टीस्टना या परिस्थितीत काहीतरी हातभार मिळावा यासाठी हा उपक्रम मागच्या लॉकडाउन वेळी सुरू केला होता. पण आता पुन्हा एकदा लॉकडाउन झाल्याने कलाकार पुन्हा बेरोजगार झाले आहेत. तर आता ‘नाइन रस’ या ऍप वर क्लब्स तसेच ग्रुप्स एकत्र जॉइन्ट स्क्रीन प्ले करु शकतात तर त्यासाठी सप्सक्रिप्शन भरावं लागणार आहे.
  यामुळे घरी बसूनच नाटकांचा आनंद घेता येणार आहे. तर यातील मोठी रक्कम ही कलाकार तसेच अन्य रंगकर्मी यांना जाणार आहे. तर उरलेली रक्कम ही अन्य गरजू स्टेज कलावंताना दिली जाणार आहे. याविषयी बोलताना श्रेयस म्हणाला, “आम्ही नाइन रस ही संकल्पना मागील वर्षी स्टेज आर्टीस्टना मदत करण्याच्या हेतून आणली होती. पण यावर्षी पुन्हा एकदा हे सगळे कलाकार त्याच समस्येला सामोरं जात आहेत. त्यामुळे आम्ही नाइन रसच्या टिम ने पुन्हा एकत्र येत कलाकारांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन या चांगल्या कामात मदत करतील.”

  जळगांवची तरुणी कशी झाली 'म्हाळसा'? पाहा मराठमोळ्या सुरभी हांडेचा अनोखा प्रवास

  पुढे श्रेयस म्हणाला, “मी सगळ्यांना विनंती करतो की, या कठीण काळात सुरक्षित राहा आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.” नाइन रस हे नाटक, स्किट्स, विविध प्रकारच्या कथा कथन, लाइव्ह परफॉर्मन्सेस, स्टॅन्डअप शो अशा प्रकारच्या कन्टेट साठी बनलेलं ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. जे की मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या