मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

“लग्न करू नकोस”, 3 दिवस आधी दिग्दर्शकाने दिली होती ताकीद; श्रेयसने शेअर केला किस्सा

“लग्न करू नकोस”, 3 दिवस आधी दिग्दर्शकाने दिली होती ताकीद; श्रेयसने शेअर केला किस्सा

इकबाल चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यानचा एक किस्सा श्रेयस ने सांगितला आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या काही दिवस आधी श्रेयसचं लग्न ठरलं होतं. पण जेव्हा ही गोष्ट दिग्दर्शक नागेश यांना समजली तेव्हा त्यांनी लग्नाला साफ नकार दिला.

  • Published by:  News Digital

मुंबई 16 मे : श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मराठी तसेच बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मराठी चित्रपटांसोबतच श्रेयसने काही हिंदी चित्रपटांतही कामं केलं आहे. त्यात ‘इकबाल’ (Iqbal), ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

इकबाल चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यानचा एक किस्सा श्रेयसने सांगितला आहे. तर यात त्याने एक अतिशय चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या काही दिवस आधी श्रेयसचं लग्न ठरलं होतं. पण जेव्हा ही गोष्ट दिग्दर्शक नागेश यांना समजली तेव्हा त्यांनी लग्नाला साफ नकार दिला. व लग्न करू नको असं म्हटलं. जेव्हा की लग्नाच्या पत्रिकाही वाटून झाल्या होत्या व लग्नाला अवघे तीन दिवस उरले होते.

‘इकबाल’ या चित्रपटात श्रेयसची भूमिका एका किशोरवयीन मुलाची होती. त्यामुळे जर श्रेयसने लग्न केलं तर प्रेक्षक त्याला एक किशोरवयीन मुलगा लग्न झालेला म्हणून स्वीकारणार नाहीत. आणि त्यामुळेच त्यांनी या लग्नाला नकार दिला होता.

आणखी एक दरवाजा झाला बंद; मुंबई, गोवा नंतर ओडिसामध्येही शूटिंगची परवानगी रद्द

पण लग्नाला अवघे तीन दिवस उरले होते व पत्रिकाही वाटून झाल्या होत्या. तेव्हा श्रेयसने आपण हे लग्न लपवून ठेऊ व याची कुठेही वार्ता होणार नाही असं सांगितलं आणि त्यानंतर श्रेयसला लग्नाची परवानगी मिळाली व एक दिवसाची सुट्टी देखिल.

त्यानंतर चित्रपट प्रदर्शित होईपर्यत याची कोणालाही खबर लागली नव्हती. चित्रपटाचे निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांनादेखील श्रेयसचं लग्न झालं आहे यावर विश्वास बसत नव्हता. व ते श्रेयसला एक किशोरवयीन 18 वर्षीय मुलगाच समजत होते. यानंतर चित्रपटाच्या प्रिमियरला श्रेयसच्या पत्निने येण्याचा हट्ट केला तेव्हा ती नागेश यांची बहीण बनून गेली होती.

First published:

Tags: Bollywood, Entertainment