• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • EXCLUSIVE: .... म्हणून 17 वर्षांनी श्रेयस तळपदे अचानक वळला मराठी मालिकेकडे!

EXCLUSIVE: .... म्हणून 17 वर्षांनी श्रेयस तळपदे अचानक वळला मराठी मालिकेकडे!

जवळ जवळ 17 वर्षानी श्रेयस तळपदे मालिकेत काम करतोय. माझी तुझी रेशीमगाठ या नवी मराठी मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर गाजतोय. बॉलिवूड गाजवणाऱ्या या मराठमोळ्या कलाकाराशी बातचीत..

 • Share this:
  सोनाली देशपांडे जवळ जवळ 17 वर्षानी श्रेयस तळपदे मालिकेत काम करतोय. माझी तुझी रेशीमगाठ. मला आठवतेय  अवंतिका मालिकेच्या  वेळी मी त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला त्याच्या घरी गेले  होते अंधेरीला. तेव्हा आईने हाक मारल्यावर त्याने आत जाऊन माझ्यासाठी चहा आणला होता. आजही तो तितकाच साधा सरळ आहे.  हीच आठवण त्यालाही आहे.  याच गप्पा मारता मारता तो मालिकेबद्दल सांगू लागला. ' काय आहे ना, हल्ली मोबाईल फोनचा पडदाच सर्व काही झालंय. म्हणजे सिनेमा करणारे मालिका करू शकत नाहीत,  असं काही राहिलं नाही. मला प्रेक्षकांशी कनेक्टिव्हिटी ठेवायची होती. प्रेक्षकांकडूनही तशी विचारणा व्हायची.' श्रेयस सांगत होता. ' मला गोष्ट आवडली. माझी भूमिका आवडली. शिवाय मी एक अभिनेता आहे.  माध्यम कुठलंही असो. मी स्टेज केलंय, स्किट केलंय सर्व केलंय. माझं काम लोकांपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे.' श्रेयस पुढे सांगतो, काही कलाकारांना टीव्हीवर पाहायला मला आवडेल, तसं काहींना मला टीव्हीवर पाहायला आवडणार आहे. शिवाय टीव्हीनेच आम्हाला ओळख दिली. तो म्हणतो, आपलं आयुष्य एकच आहे, त्यात फार विचार करण्यात वेळ घालवू नये. आपलं काम करावं. पण आपल्या व्यक्तिरेखेबद्दल फारसं सांगायला तो तयार नाही. श्रेयस म्हणाला, ' ही एक प्रेमकथा आहे. लोक मालिकेतल्या व्यक्तिरेखांशी रिलेट करू शकतील आणि ही प्रेरणादायी गोष्ट आहे.' ‘अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय’; तो सीन करताना मधुराणी यांना कोसळलं रडू श्रेयस प्रार्थना बेहरेबरोबर पहिल्यांदाच काम करतो.  बोलता बोलता त्याने एक किस्साही सांगितला. ' माझ्या आईची आई बडोद्याची. त्यामुळे अनेक नातेवाईक तिथले. माझ्या एका नातलगाच्या बिल्डींगमध्ये प्रार्थना राहायची. मग मी तिथे कधी गेलो, तर श्रेयस आला म्हणून सगळ्यांना उत्सुकता असायची. तिने काही वर्ष पत्रकारिता केलीय. त्यावेळी माझे इंटरव्ह्यू पण तिने घेतलेत. आणि आता ती माझी नायिका आहे. प्रामाणिक अभिनेत्री आहे. आता कामाची सुरुवात झालीय. आमचं ट्यूनिंग जुळतंय. ' बॉलिवूड कलाकार जेव्हा मालिका करतो, तेव्हा त्याच्या काही सजेशन्स असतात का? ' मी ढवळाढवळ करत नाही. दिग्दर्शकाचे एक व्हिजन असते. या कालावधीत बऱ्याच गोष्टी बदलल्यात. काही नव्याने झाल्यात.  आता ओटीटीमुळे चॅनेल्ससमोरही स्पर्धा वाढलीय. नवनवे प्रयोग होतायत. त्यांनीही कंबर कसलीय. ' श्रेयस म्हणतो, मी पण शिकतोय. आपण शाळा काॅलेजमध्ये परीक्षा देऊन बरीच वर्ष झाल्यावर पुन्हा परीक्षा द्यायला सांगितली, तर ते टेम्परामेंट राहात नाही,  तसेच मी डेली सोप करून अनेक वर्षे झालीत.  मालिकेचे लेखक दिग्दर्शक यांना माहीत आहे की प्रेक्षकांना काय हवंय ते. सो ते त्यांच काम करत आहेत. मी माझं काम चोख करणं महत्त्वाचं. आभाळ माया,  अवंतिका दामिनी मालिका करून श्रेयसला खूप वर्ष झाली. मराठी वेब सीरिजला मिळणार हक्काचा प्लॅटफॉर्म; येतंय स्वप्निल जोशीचं OTT App श्रेयसने स्वत: ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केलाय. नाईन रसा. यावर नाटकं , परफॉर्मिंग आर्ट दाखवले जातात. त्याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, ' कोरोना काळात जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा या कल्पनेने आकार घेतला. नाटकातून आलेला कलाकार नाटकासाठी काही तरी करतोच. शिक्षणही जिथे आॅनलाइन चालते  तिथे नाटक का नको? यामुळे 1500- 1600 जणांना नियमित रोजगार मिळाला. लोकांपर्यंत घरबसल्या नाटक पोचतंय.'  असं असलं तरी श्रेयस लाइव्ह थिएटरची जादूही आठवतो. त्याला नाटकात काम करायला मिळालं, तर नक्कीच आवडेल म्हणतो. 'मधे सिनेप्ले सुरू झालं होतं. त्यात एक भिंत घेऊन वेगवेगळ्या अँगलने नाटक शूट करायचे. तिथे तेंडुलकरांचे पाहिजे जातीचे हे हिंदीतलं नाटक मी केलं होतं.' Video: मिलिंद सोमणचा अजब प्रताप; भर रस्त्यात बसून करतोय अंघोळ मध्यंतरी श्रेयसचं एक वाक्य खूप व्हायरल झालं होतं. ते होतं, बॉलिवूडमधल्या मित्रांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यावर श्रेयस सांगतो, ते खूप चुकीच्या पद्धतीने समोर आलं. मी इतक्या वर्षाच्या कारकिर्दीबद्दल बोलत होतो. बॉलिवूड, मराठीत माझे चांगले मित्रही आहेत.  बॉलिवूडनं मला चांगलंही दिलंय. मी सगळ्या अनुभवाबद्दल सांगत होतो. अशा गोष्टीही अनेकांच्या बाबतीत घडतात. आणि खंजीर खुपसणारे मराठीही असू शकतात. लोकांनी काय तो निष्कर्ष काढावा. पण मी खूप काही शिकलो. ' सध्या श्रेयस एक फिल्म दिग्दर्शित करतोय. दोन सिनेमात काम करतोय. पावसाळा सुरू आहे. श्रेयस सांगतो त्याला पावसात भिजायला आवडतं. एके काळी तो तसं करायचा. पण आता घरात बसूनच पाऊस पाहतो. असो. माझी तुझी रेशीमगाठ मधून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोचणार आहेच. सध्या प्रोमो लोकप्रिय झालाय. आता इंतजार आहे मालिकेचा. (लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
  First published: