मुंबई, 04 डिसेंबर : 2020 हे वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीसाठी (Bollywood)अनेक वाईट बातम्या घेऊन येणारं ठरलं आहे. यात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. विविध टिव्ही मालिका (Tv serials) आणि चित्रपटात (films) काम केलेले शिवकुमार वर्मा (Shivkumar Verma) यांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. त्यांना सध्या वेंटीलेटरवर ठेवण्यात आलं असून क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव पल्मोनरी डिजीज (CODP)नावाचा गंभीर आजार त्यांना झाल्याचं समोर आलं आहे. हा आजार फुफुसांशी संबंधित आहे. अशी माहिती CINTAA ने अर्थातच सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशनने दिली आहे.
सिन्टाने ही माहिती एक ट्वीट करुन दिली आहे. सोबतच शिवकुमार वर्मा यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे अवाहनही त्यांनी केलं आहे. सिन्टाने सलमान खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि सनी देओल यांना उपचारासाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत मागितली आहे. असोसिएशनने पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की शिवकुमारसाठी तुम्हाला जी काही मदत करता येईल तेवढी मदत करा.'
या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये अभिनेता शिवकुमार यांच्या बँकेचा तपशील जोडला आहे. त्याचबरोबर सलमान खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि सनी देओल यांना या पोस्टमध्ये टॅग देखील केले आहे.
AN URGENT CALL FOR HELP! #CINTAA Member Shivkumar Verma is suffering from COPD and is also suspected of COVID-19. He is in need of urgent funds for hospital expenses. We humbly urge you to please help by donating whatever you can@SrBachchan @AnilKapoor @iamsunnydeol @amitbehl1 pic.twitter.com/3hHLe4I57b
— CINTAA_Official (@CintaaOfficial) December 3, 2020
हे वाचा-VIRAL: हेमा मालिनी यांचा हा जुना VIDEO सोशल मीडियावर जबरदस्त हिट, एकदा पाहाच
सिन्टाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'शिवकुमार यांची स्थिती अत्यंत नाजूक असून ते सीओपीडीसारख्या गंभीर आजाराशी झुंजत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट नकारात्मक असली तरी त्यांना आणखी बऱ्याच चाचण्या करायच्या आहेत. या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याविषयी सिन्टाचे अमित बहल म्हणाले की, आम्हाला याबाबत माहिती मिळताच आम्ही सिन्टाच्या नियमानुसार त्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले आहेत. आम्हाला शिवकुमार यांच्या मुलीने मदत मागितली होती.
शिवकुमार वर्मा यांनी आतापर्यंत बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते 2008 सालच्या राजकुमार संतोषी दिग्दर्शित‘हल्ला बोल’ चित्रपटात अजय देवगणसोबतही दिसले होते. शिवकुमार यांनी 'बाजी जिंदगी की' या चित्रपटातही काम केलं आहे.