मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद केळकरने सांगितला खास मंत्र; VIDEO पाहून तुम्हीही खळखळून हसाल

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद केळकरने सांगितला खास मंत्र; VIDEO पाहून तुम्हीही खळखळून हसाल

अभिनेता शरद केळकरने भन्नाट व्हिडीओ शेअर करत सगळ्यानांच खळखळून हसायला भाग पाडलं आहे.

अभिनेता शरद केळकरने भन्नाट व्हिडीओ शेअर करत सगळ्यानांच खळखळून हसायला भाग पाडलं आहे.

अभिनेता शरद केळकरने भन्नाट व्हिडीओ शेअर करत सगळ्यानांच खळखळून हसायला भाग पाडलं आहे.

  • Published by:  News Digital
मुंबई 2 जून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने 10वी आणि12वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचा बारावीबाबतचा निर्णय अद्याप झाला नसला तरी CBSE ची बोर्डाची परीक्षा होणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर काहींना काळजीही सतावत आहे. (12th students exam cancel) व बहुसंख्य विद्यार्थी कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाच्या निर्यणायवर समाधानी आहेत. अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) या विषयी एक भन्नाट पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये शरदच्या ‘लक्ष्मी’ (Laxmi) या चित्रपटातील सीन आहे. तर तो सगळीकडे तोडफोड करत आहे. पोस्टमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर विद्यार्थी कशाप्रकारे उत्तर देतील अशा आशयाची ही पोस्ट आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थी याचा आनंद घेत आहेत. या मीमला चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे शरदने देखिल हा मीम शेअर केला आहे. (Sharad kelkar shares funny post)
अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी शेअर देखिल केला आहे. शरदची ‘लक्ष्मी’ चित्रपटातील तृतियपंथीयाची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याच्या कामाच मोठ कोतुकही झालं होतं.
शरद हा सोशल मीडियावर अनेक अशा भन्नाट तर कधी रंजक अशा पोस्ट शेअर करत असतो. तसेच त्याची लहान मुलगी आणि पत्नी अभिनेत्री किर्ती गायकवाड (Keerti Gaekwad) सोबत तो फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असतो.

सोहमला वठणीवर आणायला पुन्हा जुनी शुभ्रा परतणार; 'अग्गंबाई सुनबाई'मध्ये नवा ट्वीस्ट

शरद लवकरच एक दोन नव्हे 5 नव्या चित्रपटांत झळकणार आहे. यातील 1 मराठी, 1 तमिळ तर 3 हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. ‘भूज’, ‘जर्सी’ (Jersey), ‘देजा वू’ हे हिंदी चित्रपट तर ‘पावनखिंड’ (Pawankhind) या मराठी चित्रपटातही तो दिसणार आहे.
First published:

Tags: Bollywood actor, Entertainment

पुढील बातम्या