नीना गुप्ता प्रेग्नंट असताना या अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी; रिचर्डपासूनच्या बाळाबाबत म्हणाला...

नीना गुप्ता प्रेग्नंट असताना या अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी; रिचर्डपासूनच्या बाळाबाबत म्हणाला...

अभिनेत्री नीना गुप्ताने (Neena Gupta) आपल्या ऑटोबायोग्राफीत (Neena gupta autobiography) अनेक खुलासे केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जून : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून प्रेग्नंट झालेली आणि आपल्या मुलीचा अविवाहित म्हणून एकटी सांभाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta)  सध्या आपल्या ऑटोबायोग्राफीमुळे (Neena gupta autobiography) चांगलीच चर्चेत आहे. सच कहूं तो या पुस्तकात तिने आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. असाच खुलासा तिने अभिनेते सतीश कौशिकबाबतही (Sastish kaushik) केला आहे.

प्रेग्नन्सीमध्ये सतीश कौशिक यांनी आपल्याला लग्नाची मागणी घातली होती असं नीता गुप्ताने सांगितलं आहे (Satish Kaushik Proposed Pregnant Neena Gupta For Marriage) . नीना क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यापासून ती प्रेग्नंट होती. त्यानंतर दोघंही वेगळे झाले. तेव्हा प्रेग्नंट नीनाचा तिच्या बाळासह आयुष्यभर हात धरण्यासाठी सतीश कौशिक पुढे आले. त्यांनी नीनाला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या बाळासह तिचा स्वीकार करण्याचं ठरवलं. बाळाला आपलं नाव देण्याचीही इच्छा व्यक्त केली. नीना गुप्ता आणि सतीश कौशिक या दोघांनी जाने भी दो यारों, मंडी या फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे.

हे वाचा - कबीर सिंगची प्रीती पडली प्रेमात? ‘त्या’ कमेंटने चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण

सच कहूं तोमध्ये नीनाने सांगितलं, सतीश कौशिक यांनी तिला लग्नाची मागणी घातली. जर तिचं बाळ डार्क स्किनचं झालं तर ती लग्नानंतर हा सतीश कौशिकचा मुलगा आहे, असं सांगू शकेल. कुणाला काही समजणारही नाही. पण नीनाने लग्नासाठी नकार दिला. तिने एकटीने आपली मुलगी मसाबाला जन्म देऊन तिचा सांभाळ केला.

वयाच्या 50 व्या वर्षी तिने लग्न केलं. मुलगी मसाबासमोर तिने आपली इच्छा व्यक्त केली. 2008 साली तिने विवेक मेहराशी लग्न केलं. आता ती आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

हे वाचा - अभिनेत्रीला ड्रग्स घेत असताना अटक; पार्टीत ओढत होती चरसने भरलेली सिगरेट

आपल्या खासगी आणि पर्सनल आयुष्यालाही तिनं दुसऱ्यांदा संधी दिली. बधाई हो मधून तिने बॉलिवूडमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' ही फिल्म केली. 'पंचायत' वेबसीरिजमध्येही ती दिसली. नुकतीच रिलीज झालेली सरदार का ग्रैंडसन' फिल्ममध्येही ती दिसली. आता ती गुडबाय फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Published by: Priya Lad
First published: June 15, 2021, 11:06 PM IST

ताज्या बातम्या