मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'लाईफमध्ये balance हवाच..', संतोष जुवेकर जिम मध्ये असा गाळतोय घाम

'लाईफमध्ये balance हवाच..', संतोष जुवेकर जिम मध्ये असा गाळतोय घाम

मराठी सिनेसृष्टीतील एनर्जेटीक अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) कठोर व्यायाम करताना दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील एनर्जेटीक अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) कठोर व्यायाम करताना दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील एनर्जेटीक अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) कठोर व्यायाम करताना दिसत आहे.

मुंबई 18 ऑगस्ट : अभिनेते स्वतःला फिट ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. तर आता मराठी अभिनेतेही मागे नाहीत. तर अभिनेत्रीही स्वतःवर मेहनत घेताना दिसतात. मराठी सिनेसृष्टीतील एनर्जेटीक अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) देखील अशीच मेहनत घेत आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो कठोर व्यायाम करताना दिसत आहे. संतोष हा अतिशय फिट आहे. पण त्यासाठी तितकीच मेहनतही घ्यावी लागते.

सोशल मीडियावर अनेकदा तो आपले वर्कआउट व्हिडीओस शेअर करत असतो. त्यानंतर त्याला अनेक कमेंट्सही मिळतात. त्याने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे की,  ‘Life मध्ये balance असेल आणि पकड मजबूत असेल तर मनगटाच्या जोरावर काहीही करता येत.’ (Santosh Juvekar workout videos)

याआधीही अनेकदा त्याने असे व्हिडीओस शेअर केले आहेत. मालिका, चित्रपट, नाटक सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपली जादू दाखवणारा संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय पाहायला मिळतो. अनेक निरनिराळ्या पोस्ट तो शेअर करत असतो. याशिवाय नुकताच तो एका अल्बममध्येही दिसला होता. ‘कधी तू असतेस’ या गाण्यात तो दिसला होता. गायक स्वप्निल बांदोडकरने (Swapnil Bandodkar) हे गाणं गायलं होतं.

संतोष मागील महिन्यात ‘हिडन’ (Hidden) या चित्रपटात देखील दिसला होता. त्यात त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. अनेक मालिकांमध्येही तो दिसला होता. तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो सक्रिय पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment