Home /News /entertainment /

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर केला खुलासा

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर केला खुलासा

अभिनेता संतोष जुवेकरनं इन्स्टाग्राम पोस्ट (sanrosh juvekar instagram post) शेअर करत त्याचं फेसबुक अकाउंट हॅक (Santosh juvekar facebook account hack)झाल्याविषयी माहिती दिली आहे.

  मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर करत असतो. मात्र सोशल मीडिया जेवढा चांगला प्लॅटफाॅर्म आहे तेवढाच वाईटदेखील आहे. अनेकजण सोशल मीडियाचा गैरवापर करतात. एखाद्याचं फेक अकाऊंट काढणे किंवा एखाद्याचं अकाउंट हॅक करणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी घटताना पहायला मिळतात. अशातच मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनंही (Actor santosh juvekar)यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता संतोष जुवेकरनं इन्स्टाग्राम पोस्ट (sanrosh juvekar instagram post) शेअर करत त्याचं फेसबुक अकाउंट हॅक (Santosh juvekar facebook account hack)झाल्याविषयी माहिती दिली आहे. संतोष म्हणाला, 'मित्रांनो माझ facebook page काही महिन्यांन पूर्वी hack झालं होत. त्यावर फारच अश्लील photo post केले जात आहेत. मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे cyber crime आणि local police station ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल'. तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद. हेही वाचा - Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा! संतोषची ही पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचे चाहतेही पोस्टवर अनेक कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. संतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यानं   अनेक  वेबसिरिजमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
  दरम्यान, संतोष सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतो. आगामी प्रोजेक्टविषयीसुद्धा तो चाहत्यांसोबत शेअर करताना पहायला मिळतो. चाहतेही त्याच्या फोटोंवर, व्हिडीओंवर भरभरुन प्रेम देतात.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Facebook, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या