संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास त्रास होत असल्याने केलं भर्ती

संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास त्रास होत असल्याने केलं भर्ती

काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12000 हून अधिक नोंदवली गेली आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच अभिनेता संजय दत्त याला लीलावती रुग्णालयात भर्ती केल्याची बातमी समोर आली आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णालयात अधिक तपासणी केल्यानंतर त्याला होत असलेल्या त्रासाचं निदान करण्यात येईल. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार सध्या संजय दत्त याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही काळ त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. लीलावती व्यवस्थापकांकडून संजय दत्त याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-अखेर ज्युनिअर बच्चन कोरोना निगेटिव्ह! जवळपास महिनाभराने अभिषेक 'जलसा'मध्ये

काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक व ऐश्वर्या बच्चनसह त्यांची मुलगी आराध्या यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. अमिताभ यांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आलं होतं. अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर म्हणजे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading