अभिनेते संजय दत्त काही दिवसांसाठी बॉलिवूडमधून घेणार ब्रेक, कारणही केलं जाहीर!

अभिनेते संजय दत्त काही दिवसांसाठी बॉलिवूडमधून घेणार ब्रेक, कारणही केलं जाहीर!

आता कोरोनाच्या काळात फारसं बाहेर जाता येत नाही. कामावरही बंधणं आली आहेत. त्यामुळे या काळात तब्येतीवर जास्त लक्ष देण्याचा निर्णय संजय दत्त यांनी घेतलाय.

  • Share this:

 मुंबई 11 ऑगस्ट: अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी काही दिवसांसाठी बॉलिवूडमधून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं आहे. तब्येत ठिक नसल्याने आणि उपचारासाठी मी कामामधून थोडा ब्रेक घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. माझं कुटुंब, मित्र परिवार आणि चाहते हे माझ्यासोबत आहेत. काळजीचं कुठलंही कारण नाही आणि अफवांवरही विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मी लवकरच पुन्हा परत येईन असंही त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. संजय दत्त यांना काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास जात होता. त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यामुळे उपचारांतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

संजय दत्त यांनी ट्विटरवर ही पोस्ट टाकताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना लवकर परत या अशी विनंती केलीय. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत. संजय दत्त यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावतीत दाखल करण्यात आलं होतं. नंतर काही तपासण्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला होता.

संजय दत्त यांच्या करियरमध्ये अनेक चढउतार आले होते. काही वर्ष त्यांनी जेलमध्येही काढली होती. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र ते सतत कार्यमग्न होते. आता कोरोनाच्या काळात फारसं बाहेर जाता येत नाही. कामावरही बंधणं आली आहेत. त्यामुळे या काळात तब्येतीवर जास्त लक्ष देण्याचा निर्णय संजय दत्त यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 11, 2020, 5:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या