Home /News /entertainment /

अभिनेत्री रिचा चड्डा घेतेय कथ्थकचे धडे! दिसणार भन्साळींच्या OTT डेब्यूमध्ये

अभिनेत्री रिचा चड्डा घेतेय कथ्थकचे धडे! दिसणार भन्साळींच्या OTT डेब्यूमध्ये

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेत्री रिचा चड्डा मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यासाठी रिचा कथ्थक नृत्याचे धडे घेत आहे.

    मुंबई, 29 जून: बॉलिवूड अभिनेत्री मॉडेल रिचा चड्डा (  Richa Chadda) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.  रिचा चड्डा बॉयफ्रेंड अलीबरोबरचे फोटो नेहमीच शेअर करत असते. त्याचप्रमाणे सामाजिक विषयांवरही रिचा तिचं मत व्यक्त करत असते. रिचानं केलेल्या वक्तव्यांमुळे अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. तिने अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असते. हिच रिचा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. रिचा कथ्थकचे धडे घेत आहे. (Richa Chadda Leared Kathak)  नाचाचा सराव करत असतानाचे रिचाचे काही फोटो समोर आले आले आहेत. रिचा लवकरच संजय लिला भन्नसाली यांच्या हिरामंडी या सिरीजमध्ये दिसणार आहे. (Sanjay Leela Bhansali New Film Heeramandi) हिरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची पहिली ओटीटी कलाकृती आहे. सीरिजसाठी भन्नसाली यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री रिचा चड्डा सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमिकेसाठीच रिचा सध्या स्पष्ट उच्चारण आणि कथ्थक नृत्याचे धडे घेत आहे.  रिचासाठी कथ्थक काही नवं नाही. गेली अनेक वर्ष ती नृत्य करतेय. रिचाला अनेकदा संजय लीला भन्साळीच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे.  भन्साळी यांच्या आतापर्यंतच्या करिअरमधील त्यांची ही कलाकृती फार खास असणार आहे. हिरामंडी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - 'एखाद्या अभिनेत्याच्या तोंडची वाक्यं','हास्यजत्रा' फेम समीर चौगुलेबाबत काय म्हणाला प्रसाद ओक संजय लिला  भन्साळींसाठी हिरामंडी फार महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. भन्साळीचा ओटीटी डेब्यू तितकाच खास आणि तगडा असेल यात काही शंका नाही.  सिनेमासाठी अभिनेत्री रिचा चड्डाची लुक टेस्ट झाली आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं वाचन झालं आहे आणि त्यानंतर तिनं कथ्थकचा सराव सुरू केला आहे. पुढच्या महिन्यात मुंबईत सीरिजच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.  रिचा 2 आठवडे झाले कथ्थकचे धडे घेत असून आणखी काही दिवस ती शिक्षण पूर्ण करुन शुटींगला सुरुवात करणार आहे. गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतरही रिचानं अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सिद्धू मुसेवालाला लाँरेंस बिश्नोईसारखी सुरक्षा का दिली नाही असा सवाल तिनं केला होता. रिचा तिचा बॉयफ्रेंड अली फझलबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. दोघे लवकरच लग्न करणार असून दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

    पुढील बातम्या