• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'आजही दीपिकाची पँट घातलीस?' नव्या लुकमुळे रणवीर पुन्हा चर्चेत

'आजही दीपिकाची पँट घातलीस?' नव्या लुकमुळे रणवीर पुन्हा चर्चेत

पुन्हा एकदा दिसला रणवीर सिंगचा हटके अंदाज, संजय लीला भन्साळींच्या ऑफिसबाहेर झाला स्पॉट, नव्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता.

 • Share this:
   मुंबई  2 जुलै : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) कधी कोणती स्टाईल करेन याचा काही नेम नाही. हटके स्टाईल ने नेहमीच तो चर्चेत राहतो. नुकताच त्याचा एक आगळावेगळा लुक समोर आला होता ज्यात त्याने भरगच्च दागिने परिधान केले होते. रणवीरच्या या लुक ची फारच चर्चा झाली होती. पण त्यानंतर लगेचच रणवीर पुन्हा एकदा नव्या हटके अंदाजात दिसला. त्यानंतर नेटिझन्सनी त्याला भन्नाट प्रश्न ही विचारले आहेत. मरून रंगाची हटके पँट परिधान करत त्यावर आकाशी रंगाचा शर्ट त्याने घातला होता. त्यामुळे अनेकांनी रणवीर वर कमेंट्स केल्या आहेत. तर रणवीर चा हा बिनधास्त पणा काहींना आवडला देखील आहे.
  याआधीही रणवीरने अनेकदा असे हटके कपडे परिधान केले होते. नुकताच त्याने निळ्या रंगाचा दागिने घातलेला, मोठे केस असलेला एक लुक केला होता.
  तर त्याआधी रंगीबेरंगी कपडे परिधान करत साऱ्यांच लक्ष वेधलं होतं. त्यामुळे रणवीर त्याच्या लुकने कायमच चर्चेत राहतो.
  विशेष म्हणजे रणवीर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ऑफिस बाहेर दिसला होता. त्यामुळे भन्साळी आणि रणवीर आता नवा कोणता मसाला चित्रपट घेऊन येणार याकडे साऱ्यांच लक्ष लागलं आहे.

  47 व्या वर्षीही हृतिकच्या फिटनेसची जादू कायम; तरुणांनाही लाजवेल लेटेस्ट फोटोशूट

  भन्साळींच्या ‘रामलीला’ पासून रणवीरला खरं स्टारडम (Stardom) मिळायला सुरुवात झाली होती. त्यानंतर ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ असे सुपरहिट चित्रपट भन्साळी आणि रणवीर यांनी दिले. त्यामुळे या जोडीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याशिवाय रणवीर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या दोन चित्रपटांत दिसणार आहे. तर ‘83’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
  Published by:News Digital
  First published: