मुंबई, 20 एप्रिल : बॉलिवूड तसेच सिनेविश्वात येण्याची अनेकांची इच्छा असते. अनेकजण त्यात सफल होतात तर काहीजण हे असफल ठरतात. विशेषत: कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्यांसाठी हा प्रवास फारच कठीण ठरतो. बॉलिवूडमध्ये सध्या प्रंचड चर्चेत असणारा व अल्पावधीतच अनेक पुरस्कार आपल्या नावावर करणारा अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ने नवोदितांसाठी विशेष सल्ला दिला आहे.
एका मुलाखतीत रणवीरला त्याच्या स्टारडमच्या (stardom) प्रवासाविषयी विचारल असता त्याने सांगितल, जेव्हा तरूण अभिनेते, विशेषता आऊटसाइडर्स (outsiders) माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात की या स्ट्रगल मधून पुढे कसं जायच, तेव्हा मी सगळ्यात आधी त्यांना सांगतो की कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कारण पाहीजे. यासाठी करा की तुम्हाला ते करायला आवडतं.
“मी हाच आग्रह धरतो की, परफॉर्मिंग आर्ट किंवा मनोरंजन क्षेत्रात कोणतही लालच किंवा आकर्षण घेऊन येऊ नका. कारण या क्षेत्रात यश हे नाव आणि पैशांसोबत मिळतं. या गोष्टी अगदी क्षणिक आहेत आणि झगमगत्या आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुमच्या कामात प्रामाणिक रहा आणि काम तुमच्या परफॉर्मन्स मिळालेल्या आनंदासाठी करा.”
मंगळ होता म्हणून ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनआधी खरंच पिंपळाशी लग्न केलं होतं?
पुढे रणवीर म्हणतो, “मी माझ्या या प्रवासातून आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे खरेपणाची गूंज सगळ्यात जास्त असते. जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करत आहात जे तुम्ही नाही आहात तर तुम्ही स्वताला धोका देत आहात. जर तुम्ही जसे आहात तसेच राहीलात तर जज करण्याची भीती तुम्हाला वाटत नाही. तेव्हाच तुम्ही तुमची पुर्ण शक्ती दाखवू शकता. जितकी मोठी जोखिम तितकं मोठं इनाम. या प्रक्रियेत तुमचे पाय लडखडू शकतात. पण असफलता असं काहीत नसतं तर केवळ शिकवणी असतात.” असा सल्ला रणवीर ने दिला आहे.
रणवीर ने बँड बाजा बाराती या चित्रपटातून त्याच्या करिअर ला सुरुवात केली होती. बाजीराव मस्तानी (Bajirao mastani), रामलीला (Ramleela) , पद्मावत (padmavat) , गली बॉय (gullyboy) हे त्याच्या करिअरचे सुपरहिट चित्रपट आहेत. लवकरच तो 83 , सुर्यवंशी, जयेशभाई जोरदार, सर्कस या आगामी चित्रपटांत तो दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Ranveer sigh