• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अतिशय संस्कारी आहे रणदीप हुड्डाचा श्वान; पूजा करतानाचे फोटो पाहून चाहते अवाक्

अतिशय संस्कारी आहे रणदीप हुड्डाचा श्वान; पूजा करतानाचे फोटो पाहून चाहते अवाक्

रणदीपने पोस्ट केलेल्या फोटोत त्याचा लाडका श्वान आणि तो दोघेही मनोभावे देवाची पूजा करताना दिसत आहेत.

 • Share this:
  मुंबई 29 जून : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) चा लाडका कुत्रा फारच चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. रणदीप सोबत तो चक्क देवाची पूजा करत आहे. त्यामुळे रणदीपच्या चाहत्यांना त्याचा हा अंदाज फारच आवडत आहे. बाम्बी (Bambi) हा त्याचा लाडका पाळीव श्वान आहे. नेहमी तो त्याच्यासोबत फोटो पोस्ट करत असतो. यावेळी त्याने पोस्ट केलेल्या फोटोत दोघेही मनोभावे देवाची पूजा करताना दिसत आहेत. यावर रणदीपने 'संस्कारी डॉग अलर्ट' असं कॅप्शन ही दिलं आहे.
  यावर अनेक सेलिब्रिटींनी ही रणदीप ला कमेंट्स दिल्या आहेत. अभिनेता सिद्धांत कपूरने यावर ‘Adorable’ अशी कमेंट केली आहे तर  अदिल हुसेन ने ‘aww’ लिहीत प्रेम व्यक्त केलं आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी ही कमेंट्स केल्या आहेत.

  अभिनयासाठी या कलाकारांनी सोडलं होतं शिक्षण; शाहरुख खान ते प्रियंका चोप्रा पाहा कोण आहेत

  कोणी म्हटलं चांगले संस्कार दिले आहेत. तर कोणी म्हटलं चांगलं ट्रेन केलं आहे. अनेकांनी रणदीपच कौतुकही केलं आहे. तर काहींनी भन्नाट कमेंट्स करत लिहिलं की हा फक्त लाडू खाण्यासाठी आला आहे. त्यामुळे रणदीप चा बाम्बी चांगलाच चर्चेत आहे.
  रणदीप च्या कामाविषयी बोलायला गेलं तर नुकताच तो अभिनेता सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your most wanted bhai) या चित्रपटात तो दिसला होता. यातील त्याची खलनायकाची भूमिका हीट ठरली होती. याशिवाय लवकरच तो ‘अन फेअर लव्हली’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री इलियाना डीक्रुझ सोबत तो काम करणार आहे.
  Published by:News Digital
  First published: