'आलियाशी केव्हाच लग्न केलं असतं पण ‘तो’ आडवा आला' लग्न लांबण्याबाबत रणबीरचा खुलासा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लग्नासाठी एक पायावर तयार आहे. पण आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरच्या प्रेमात कोणीतरी तिसरा आला. त्यामुळे त्यांचं लग्न रखडलं असल्याचं तो सांगतो.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लग्नासाठी एक पायावर तयार आहे. पण आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरच्या प्रेमात कोणीतरी तिसरा आला. त्यामुळे त्यांचं लग्न रखडलं असल्याचं तो सांगतो.

  • Share this:
    24 डिसेंबर, मुंबई: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)  हे बॉलिवूडचं सर्वाचंच लाडकं कपल आहे. त्यांना एकत्र रणबीर आणि आलियाची जोडी सर्वांनाच आवडते. जवळजवळ 2 वर्ष हे दोघं एकमेंकांना डेट करत आहेत. त्यांनीही आपलं प्रेम चाहत्यांपासून लपवून ठेवलेलं नाही. हे कपल खुल्लमखुल्ला पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यामुळे त्यांचं लग्न कधी होणार असा प्रश्न चाहत्यांना कायमच सतावत असतो. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने या प्रश्नाबाबत खुलासा केला. ‘मी आलिया भट्टशी लग्न करायला तयार आहे. 2020 मध्येच मला लग्न करायचं होतं पण कोरोनामुळे (Corona) सगळीच वाट लागली. आलिया भट्ट वयाने लहान असली तरी तिने कमी वयात खूप यश संपादन केलं आहे. मला तिचा अभिमान आहे’ एकीकडे रणबीर लग्नासाठी तयार आहे असं दाखवत असताना आलिया, 'मात्र मी अजून लहान आहे. लग्नासाठी तयार नाही.' अशी प्रतिक्रिया देत आहे. आता यांचं लग्न नक्की कधी होणार हे येणाऱ्या काळात समजेलच.
    कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रणबीर कपूर आणि आलिया पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचाही महत्वाचा रोल या चित्रपटात आहे. शिवाय आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या सिनेमातही झळकणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: