• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट

‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट

राहुलची गेल्या काही दिवसात तब्येत अतिशय खालावली होती, त्याला कोरोनाची लागण झाली होती. राहुलने मृत्युपूर्वी त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट केली होती.

 • Share this:
  मुंबई 9 मे : कोरोनाचा प्रकोप (corona pandemic) काही शांत होण्याचं नाव घेत नाही. तर दिवसागणिक वाईट बातम्या कानावर पडत आहेत, अनेकांचे प्रियजन या कोरोनाने हिरावले आहेत. तर आता अभिनेता राहुल वोहरा (Rahul Vohra) याचही कोरोनाने निधन झालं आहे. नाटक दिग्दर्शक आणि लेखक अरविंद गौहर (Arvind Gohar) यांनी फेसबुक वर पोस्ट करुन ही बातमी सांगितली आहे. राहुलने मृत्युपूर्वी त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट केली होती. व त्यात त्याने मदत मागितली होती. राहुलची गेल्या काही दिवसात तब्येत अतिशय खालावली होती, त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. पण सातत्याने त्याची स्थिती खालावत होती.

  शाहरुख-भन्साळींची जोडी पुन्हा आली एकत्र; बॉलिवूडच्या बादशाहसाठी लिहिली खास कथा

  त्याने शनिवारी फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं की, 'जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो.' पुढे त्याने लिहिले की, 'मी लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता मी धैर्य गमावले आहे.' यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनिष सिसोदिया यांनाही टॅग केलं होत. सध्या राहुल ची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. राहुलची कोरोनाशी झुंज यशस्वी ठरली नाही. अखेर त्याने पोस्ट मध्ये लिहिल्या प्रमाणे खरोखरच त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. यामुळे आता हळहळ व्यक्त केली जात आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rahul Vohra (@irahulvohra)

  मुळचा उत्तराखंडचा असणारा राहुल हा डिजिटल व्यासपीठावर फारच लोकप्रिय चेहरा होता. नेटफ्लिक्स (Netflix) वरील वेबसीरिज (Freedom) ‘फ्रीडम’मध्ये तो दिसला होता. यातील राहुलच्या कामाची सगळ्यांनीच प्रशंसा केली होती.
  Published by:News Digital
  First published: