Home /News /entertainment /

राहुल रॉयची प्रकृती स्थिर; एकेकाळी आईशीच अफेअर असल्याच्या रंगल्या होत्या चर्चा

राहुल रॉयची प्रकृती स्थिर; एकेकाळी आईशीच अफेअर असल्याच्या रंगल्या होत्या चर्चा

एकेकाळी राहुल रॉयचं (Rahul Roy) स्वत:च्याच आईशी अफेअर आहे, अशाप्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या.

    मुंबई, 30 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy)ला सध्या उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्यामुळे त्याला कारगिलवरून मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. 1990 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'आशिकी' या सिनेमातील हिरो असलेल्या या अभिनेत्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. राहुल रॉय सध्या आपल्या आगामी 'एलएसी-लिव्ह द बॅटल' या सिनेमाचं चित्रीकरण कारगिलमध्ये करत होता. त्यावेळी त्याला ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलं असून लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर  उपचार सुरु आहेत. आईबरोबर अफेअरची चर्चा राहुल रॉयने एका मुलाखतीत आपला एक विचित्र किस्सा सांगितला. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, एकदा मित्रांसमवेत तो पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्याठिकाणी राहुलची आईदेखील आपल्या मैत्रिणीसोबत पार्टीसाठी आली होती. त्यावेळी दोघांनी एकत्र डान्स केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात राहुल रॉय एका जेष्ठ महिलेबरोबर रिलेशनशिपमध्ये असून तिच्याबरोबर डान्स करताना आढळून आल्याचे वृत्त पेपरमध्ये छापून आलं. यामुळे नाराज झालेल्या राहुलने म्हटलं, निदान पत्रकारांनी ती महिला कोण होती याची खात्री करण्याची गरज होती. राहुलच्या तब्येतीत सुधारणा राहुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, कारगिलमधील वातावरण खूप थंड असल्याने त्याला ब्रेन स्ट्रोक आला. त्याला कारगिलवरून श्रीनगर आणि त्यानंतर मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. राहुलची तब्येत सध्या स्थिर आहे. राहुल रॉयने आपल्या कारकिर्दीत  'आशिकी', 'फिर तेरी कहानी याद आई', 'जुनून', 'सपने साजन के', 'नसीब' यांसारख्या काही सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अनेक टीव्ही शोजमध्ये देखील काम केले आहे. 2006 मध्ये झालेल्या बिगबॉसच्या पहिल्या सीझनचा तो विजेतादेखील होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या