'आशिकी' फेम अभिनेता राहुल राॅयचा भाजपमध्ये प्रवेश

'आशिकी' फेम अभिनेता राहुल राॅयचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्लीत भाजप मुख्यालयात विजय गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

  • Share this:

18 नोव्हेंबर : नव्वदीच्या दशकातील सिनेअभिनेता आणि बिग बॉस सिझन १ चा विजेता राहुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजप मुख्यालयात विजय गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

या पत्रकार परिषदेत राहुल रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वावर स्तुतीसुमनं उधळली. राहुल रॉय यांनी ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकीमध्ये प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं मात्र त्यात त्याला फारसं यश आलं नव्हतं. मात्र बिगबॉस सिझन  १ जिंकत ते पुन्हा चर्चेत आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 05:13 PM IST

ताज्या बातम्या