मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मॉल्स आणि हॉटेल्स मालकांचे अभिनंदन 'मोगॅम्बो खुश हुवा', प्रशांत दामलेंचा सरकारवर निशाणा

मॉल्स आणि हॉटेल्स मालकांचे अभिनंदन 'मोगॅम्बो खुश हुवा', प्रशांत दामलेंचा सरकारवर निशाणा

 'आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे,

'आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे,

'आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे,

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहे. हॉटेल, मॉल्स सुरू ठेवण्यास 10 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. पण, सिनेमागृह आणि नाट्यगृह (theater is closed) बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेते प्रशांत दामले (actor prashant damle) यांनी हॉटेल्स, मॉल्स मालकांचे अभिनंदन करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने ब्रेक द चेन म्हणत संपूर्ण राज्यात निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. पण, नाट्यगृह बंदच ठेवण्यात आल्यामुळे नाट्य क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सरकारला खोचक टोला लगावला आहे.

सीटसाठी मायलेकीचा जोरदार हंगामा, एक तास खोळंबलं विमानाचं उड्डाण

'राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा. म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या' असं म्हणत प्रशांत दामले यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

तसंच, 'आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे, असंही प्रशांत दामले म्हणाले. प्रशांत दामले यांच्या या पोस्टमुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

मंदिरं -सिनेमागृह आणि नाट्यगृह बंदच!

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. आज मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाकडून निर्बंध कमी करण्याबाबत प्रस्ताव गेला होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे, तसंच हॉटेल्स आणि मॉल सुरू करण्याबाबत टोपे यांनी घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण;कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद राहणार पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. त्याच बरोबर, सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा बंद राहणार आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

First published: