मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी..' प्रभासला 'या' गोष्टीवर लावायची आहे पाबंदी

'मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी..' प्रभासला 'या' गोष्टीवर लावायची आहे पाबंदी

 प्रभासने तो एक दिवसासाठी पंतप्रधान झाला तर काय करणार हे सांगीतल आहे.

प्रभासने तो एक दिवसासाठी पंतप्रधान झाला तर काय करणार हे सांगीतल आहे.

प्रभासने तो एक दिवसासाठी पंतप्रधान झाला तर काय करणार हे सांगीतल आहे.

मुंबई 9 जुलै : अभिनेता प्रभासने (Prabhas) साऊथ चित्रपटांतच नव्हे तर बॉलिवूड (Bollywood) मध्येही मोठं नाव कमावलं आहे. मागील वर्षी तो ‘साहू’ (Sahoo)  या चित्रपटात झळकला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत (Shraddha Kapoor) त्याची केमिस्ट्री विशेष लोकप्रिय ठरली होती.

याचं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा प्रभासचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रभासने तो एक दिवसासाठी पंतप्रधान झाला तर काय करणार हे सांगीतल आहे. प्रभासचा हा जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (Prabhas viral video)

सोज्वळ अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही आहे संस्कारी; अभिनेत्यानेच जुळवलं होतं दिव्यांकाचं अरेंज मॅरेज

दरम्यान श्रद्धा आणि प्रभास त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये गेले होते तेव्हा कपिलने प्रभासला काही प्रश्न विचारले त्यातील एक म्हणजे “जर एक दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं तर तू सर्वात आधी काय करशील?”

यावर प्रभासनेही त्याच दमदार अंदाजात उत्तर दिलं व म्हटलं की, “मला वाटतं की मी इंडस्ट्रीतील ही मुलाखत देण्याची प्रक्रिया पहिली बंद करेन.” प्रभासच हे उत्तर ऐकून कपिल सह सगळेच जण खळखळून हसू लागले.

'फायटर' ठरणार भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट; अवकाशात रंगणार चित्तथरारक सीन्स

‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेला अभिनेता प्रभास सध्या साऊथ सह बॉलिवूड मध्ये चांगली लोकप्रियता मिळवत आहे. त्याच्या कामाचं ही मोठं कौतुक केलं जातं. लवकरच प्रभास ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सोबत तो दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Kapil sharma, Prabhas, Shraddha kapoor