मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आपल्या मुलांना सांभाळा' Aryan Khan च्या जामीनावर अभिनेते Piyush Mishra यांची प्रतिक्रिया चर्चेत

'आपल्या मुलांना सांभाळा' Aryan Khan च्या जामीनावर अभिनेते Piyush Mishra यांची प्रतिक्रिया चर्चेत

ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा  (Piyush Mishra)  हे एखाद्या प्रकरणाविषयी नेमकी आणि मोजकी प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत अनेक गंभीर विषयांवर त्यांनी विचारपूर्वक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलाच्या ड्रग्ज केसविषयीदेखील माध्यमांनी पीयूष मिश्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा ...
 मुंबई, 30ऑक्टोबर- ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा  (Piyush Mishra)  हे एखाद्या प्रकरणाविषयी नेमकी आणि मोजकी प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत अनेक गंभीर विषयांवर त्यांनी विचारपूर्वक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलाच्या ड्रग्ज केसविषयीदेखील माध्यमांनी पीयूष मिश्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर मिश्रांनी दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती त्याविषयी मिश्रा यांनी अतिशय गोंधळात टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्जप्रकरणी (Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) शुक्रवारी (28 ऑक्टोबर 2021) हायकोर्टानं जामीन मंजूर केला. त्यानंतर अभिनेता पीयूष मिश्रा यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. बॉलिवूड लाईफ डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जवळपास तीन आठवडे आर्थर रोड जेलमध्ये काढल्यानंतर शुक्रवारी हायकोर्टानं शाहरूखचा मुलगा आर्यन खानला दिलासा दिला आहे. हायकोर्टानं त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ' पालकांनी आपल्या मुलांना सांभाळायला शिकलं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया पीयूष मिश्रा यांनी आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर दिली. हिंदूस्थान टाईम्सशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘माझी काय प्रतिक्रिया असेल? जे काही केलं ते त्यानं (आर्यन) केलं, आता त्याला जामीनही मिळाला असून तो तुरुंगाबाहेर आला. येथून पुढचं शाहरुख खाननीच ठरवावं, शाहरुखचा मुलगा आहे त्यामुळे शाहरुख आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) या प्रकरणाचं काय करायचं ते पाहून घेतील. ज्यांनी चूक केली त्यांना भोगावचं लागेल. माझं इतकचं म्हणणं आहे की पालकांनी मुलांना सांभाळलं पाहिजे,' असं उत्तर मिश्रा यांनी टाईम्सच्या रिपोर्टरनं प्रश्न विचारल्यानंतर दिलं. मिश्रांची ही प्रतिक्रिया अनेकांना गोंधळात टाकणारी आहे. शाहरुख खान आणि मिश्रा यांनी 1998मध्ये 'दिल से' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 'दिल से'मध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत होता तर मिश्रा सीबीआय ऑफ‍िसरच्या भूमिकेत होते. (वाचा:26 दिवस तुरुंगात राहिलेल्या आर्यनला मिळाले 9750 रुपये, पाहा का मिळाले हे पैसे आज (30 ऑक्टोबर 2021) सकाळी आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली आहे. 28 ऑक्टोबर रोजी हायकोर्टनं आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला जामीन मंजूर केला. शुक्रवारी (29 ऑक्टोबर) ते तुरुंगातून बाहेर आले असते. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यास उशिर झाल्यामुळे त्यांना शुक्रवारची रात्रदेखील आर्थर रोड तुरुंगातचं काढावी लागली. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जामिनाची सर्व कागदपत्रे सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत सादर केली गेली असती तर ७ वाजेपर्यंत त्यांची सुटका होऊ शकली असती. त्यापूर्वी एएनआयनं देखील ट्विट केलं होतं की, 'आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानची शुक्रवारी तुरुंगातून सुटका होणार नाही. त्याला शनिवारी सकाळी सोडण्यात येणार आहे.'3 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं मुंबईत एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून आर्यन खान तुरुंगात होता. यापूर्वी न्यायालयानं दोनदा त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
First published:

Tags: Aryan khan, Entertainment, Shahrukh khan

पुढील बातम्या