मुंबई, 07 मार्च : अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या कामापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. तिने अनेक पोस्टमधून तिच्या फॅन्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू धर्माबाबत ती अनेक पोस्ट करत असते. अनेकदा ट्रोल झाल्यामुळे मोठ्या संकटांना देखील पायलला सामोरं जावं लागलं आहे. मात्र सध्या Yes Bank प्रकरणामुळे तिचे वडील संकटात सापडले आहेत. येस बँक प्रकरणाबाबत तिने ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला टॅग करत तिने मदत मागितली आहे.
अभिनेत्री पायल रोहतगीने याआधीही अनेक पोस्ट करुन सरकारची मदत मागितली आहे. यावेळीही तिने येस बँक प्रकरणामुळे सरकारची मदत मागितली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री पायल रोहतगीचे वडील शशांक रोहतगी सुद्धा यामुळे अडचणीत सापडले आहेत. अहमदाबादमधील सुभाष चौक याठिकाणी असलेल्या येस बँकेच्या शाखेमध्ये त्यांचे जवळपास 2 कोटी रुपये अडकले आहेत.
पायल रोहतगीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिच्या वडिलांचं येस बँकेच्या गुडगाव शाखेमध्ये खातं होतं. 7 वर्षांपूर्वी त्यांनी ते अहमदाबादच्या शाखेमध्ये ट्रान्सफर केलं. रिटायरमेटंनंतर ते अहमदाबादमध्येच राहतात. 70 वर्षीय शशांक यांना कर्करोगाने ग्रासले आहे. त्यामुळे या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी लागणारे पैसे काढण्यासाठी वडीलांना समस्यांचा सामना करावा लागेल असंही पायल म्हणाली. त्यांनी या बँकेतील पैसे इतर बँकेत काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण बँकेत जाऊन चेक घेण्याआधीच आरबीआयकडून घोषणा करण्यात आल्याचं पायल म्हणाली.
Ram Ram ji 🙏 Get #YesBank to function @PMOIndia @HMOIndia. This is NOT DONE 🙏 This is not a sign of blooming economy 🙏 #PayalRohatgi
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) March 5, 2020
ती पुढे म्हणाली की, तिच्या वडिलांना येस बँक प्रकरणाबाबत आधी माहित झालं होतं आणि त्यामुळे ते इतर बँकेत त्यांचे पैसे ट्रान्सफर करणार होते. पण येस बँकेने नेहमी त्यांना सर्वकाही पूर्वपदावर आल्याचा दिलासा दिला. दरम्यान या प्रकरणामुळे सामन्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.