Home /News /entertainment /

आलिया भट्टचा हिरो असणार प्रसिद्ध TV अभिनेता, या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

आलिया भट्टचा हिरो असणार प्रसिद्ध TV अभिनेता, या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

2020 मध्ये आलिया भट्टचा (Alia Bhatt) फक्त एक सिनेमा 'सडक 2' (Sadak 2) प्रदर्शित झाला. पण येणाऱ्या वर्षात आलिया भट्टचे नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत आणि यामध्ये ती विविध कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे

  मुंबई, 25 डिसेंबर: यावर्षी 2020 मध्ये आलिया भट्टचा (Alia Bhatt) फक्त एक सिनेमा 'सडक 2' (Sadak 2) प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड ट्रोल झाला होता. पण येणाऱ्या वर्षात आलिया भट्टचे नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, ज्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.  2021 मध्ये आलिया निरनिराळ्या भूमिकांतून विविध अभिनेत्यानंबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लवकरच छोट्या पडद्यावरील एक सुप्रसिद्ध अभिनेता आलिया बरोबर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. कसोटी जिंदगी के (Kasautii Zindagi Kay) फेम पार्थ समथान (Parth Samthaan) आलिया भट्ट बरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या सिनेमातून पार्थ बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, अशी चर्चा होती. पण एका मीडिया रिपोर्ट्सनुसार पार्थ या सिनेमात आलियाबरोबर स्क्रीन शेअर करणार नाही आहे.
  पार्थने एका मुलाखतीमध्ये देखील असं सांगितलं होतं की त्याने नुकताच एक हिंदी चित्रपट (Hindi Movie) साइन केला आहे. त्यानंतर तो आलियाबरोबर डेब्यू करणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान बॉलिवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार पार्थ गंगूबाई काठियावाडीमध्ये दिसणार नाहीये. पार्थच्या निकटवर्तीय एका सूत्राच्या हवाल्याने या अहवालात असं म्हटलं आहे की, पार्थने रेसुल पुकूट्टीचा (Resul Pookutty)  सिनेमा पिहरवा (Piharwa) साइन केला आहे. हा चित्रपट शहीद हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात पार्थ अभिनेत्री आलिया भट्ट बरोबर दिसणार आहे. (हे वाचा-Coolie No 1 Movie Review: वरुण-साराने केलेला हा रीमेक म्हणजे...) रेसुल पुकूट्टी  दिग्दर्शित सिनेमा पिहरवा (Piharwa) भारत-चीन युद्धावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याचे बोलले जात होते. पण आलिया भट्ट आधी संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे काम पूर्ण करेल आणि त्यानंतर तिच्या उर्वरित प्रोजेक्टचे काम करणार आहे. दिग्दर्शक रेसुल पूकुट्टी आलिया भट्टच्या टीमबरोबर शूटिंगच्या तारखा ठरवत आहेत. पण आलियाचा बिझी शेड्युल बघता पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पार्थ ऑल्ट बालाजीच्या आगामी वेब सीरिज 'मैं हीरो बोल हूं' मध्ये दिसणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood actress, Tv actor, Tv actors

  पुढील बातम्या