Home /News /entertainment /

लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याला हवीशी वाटतेय रिलेशनशिप, पाहा काय म्हणाला...

लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याला हवीशी वाटतेय रिलेशनशिप, पाहा काय म्हणाला...

एम टिव्ही (MTV) वरील ‘कैसी है ये यारिया’ आणि स्टार प्लस (Star Plus) वरील एकता कपूरची (Ekta Kapoor) ‘कसोटी जिंदगी की 2’ या मालिकांमधून पार्थला तूफान लोकप्रियता मिळाली होती. पार्थने नुकतीच एक मुलाखत दिली होती होती आणि त्यामध्ये त्याने त्याच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 5 मे : छोट्या पडद्यावरील हॅन्डसम हंक अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मालिकांनंतर तो एका वेबसीरिज मध्येही झळकत आहे. पार्थने नुकतीच एक मुलाखत दिली होती होती आणि त्यामध्ये त्याने त्याच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे. एम टिव्ही (MTV) वरील ‘कैसी है ये यारिया’ आणि स्टार प्लस (Star Plus) वरील एकता कपूरची (Ekta Kapoor) ‘कसोटी जिंदगी की 2’ या मालिकांमधून पार्थला तूफान लोकप्रियता मिळाली होती. टिव्हीचा हॅन्डसम हंक तसंच अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत अशी पार्थची ओळख आहे. कमी काळातच त्याने मोठा चाहता वर्गही निर्माण केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. याशिवाय लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत तो चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.
  सिद्धार्थ कानन याला दिलेल्या मुलाखतीत पार्थ म्हणाला, ‘मी सध्या सिंगल असून खूश आहे. सध्याचा साथीचा आणि लॉकडाऊनचा काळ पाहता मी रिलेशनशिपमध्ये असायला पाहिजे होतं, असंही पार्थ म्हणाला. पुढे पार्थ म्हणाला, लवकरात लवकत ही सध्याची परिस्थिती ठिक होऊन लोक आपापली कामं करण्यासाठी बाहेर पडोत अशी आशा आहे.’ रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी तयार आहेस का या प्रश्नावर पार्थने होकारार्थी उत्तर दिलं होतं.

  'ते स्वस्थ आणि सुरक्षित आहेत', रामायण फेम अरविंद त्रिवेदी आणि गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर स्पष्टीकरण

  पार्थ सध्या ALT Balaji ची वेबसीरिज ‘मै हिरो बोल रहा हू’ (Mai Hero Bol Raha Hu) या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. त्यात तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आहे. प्रेक्षकांचा या नव्या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Television

  पुढील बातम्या