मुंबई, 18 एप्रिल : देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. तर बॉलिवूडवर (Bollywood) वरही कोरोनाचं सावट आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली असून ते कोरोनाशी सामना करत आहेत. रोज नवनवीन नाव समोर येताना दित आहेत. तर आता अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) सह त्याचं संपूर्ण कुटुंब हे कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. त्याच्या दोन वर्षाच्या मुलीलाही कोरोनाची लागन झाली आहे.
नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरुन ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिल आहे, ‘प्रत्येक तऱ्हेची काळजी घेऊन तसेच घरात राहूनही मला आणि माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही सगळे घरात क्वारंटाइन (quarantine) झालो आहोत व डॉक्टरांनी सांगितलेली औषधे तसेच सुचनांचं पालन करत आहोत. तुमच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद, काळजी घ्या सुरक्षित रहा’. तर या पोस्ट ला कॅप्शन देत त्याने लिहिलं होत, ‘तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची गरज आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या हलक्यात घेऊ नका’.
View this post on Instagram
याच दरम्यान नीलने एक मुलाखत दिली त्यात त्याने म्हटलं आहे की, “तुम्ही समजू शकता की मी आता कोणत्या परिस्थितीत आहे. माझी दोन वर्षांची मुलगी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सुदैवाने ती आता ठीक आहे, दोन दिवसांपूर्वी तिला ताप आला होता तेव्हा आम्ही तिची टेस्ट केली. व ती पॉसिटिव्ह आली. याशिवाय कुटुंबातील सगळेच सदस्य पॉझिटिव्ह आले आहेत. आई , बाबा, भाऊ, पत्नी , मुलगी ,मी सगळेच. आता फक्त आई ठीक आहे.”
‘याला म्हणतात संवेदना जपणं’; मराठी दिग्दर्शकानं केलं राहुल गांधींचं कौतुक
नील पुढे म्हणाला, “सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की यातून बाहेर पडण्याचा कोणताही झटपट मार्ग नाही. आता आम्हा सगळ्यांना हलकी लक्षणं आहेत. माझ्या भावाला कोणतच लक्षण नाही.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.