• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sushant Singh Rjput: नाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट, दिली ही भावुक प्रतिक्रिया

Sushant Singh Rjput: नाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट, दिली ही भावुक प्रतिक्रिया

भेटीच्या वेळी नाना पाटेकर भावुक झाले होते. हा धीर आणि संयमाचा काळ असल्याचंही त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं.

 • Share this:
  पाटणा 28 जून: अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आज पाटण्यात सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rjput) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुशांतचे वडिल कृष्णकुमार सिंह यांना ते भेटले आणि त्यांचं सांत्वन केलं. सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी आणि उत्तम अभिनेता होता अशी प्रतिक्रिया नानांनी या भेटीनंतर दिली. त्यावेळी नाना पाटेकर भावुक झाले होते. हा धीर आणि संयमाचा काळ असल्याचंही त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल असंही ते म्हणाले. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर पाटण्यात आले आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. मुंबईतल्या फ्लॅटमध्ये त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant singh Rajput ) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या ज्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या त्यातून बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली आहे. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या असून त्याची माहिती त्या डायऱ्यांमध्ये सापडली आहे. सुशांची माजी मॅनेजर श्रुती मोदीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना अनेक गोष्टी कळाल्या होत्या. सुशांतने या डायऱ्यांमध्ये त्याची स्वप्न आणि गोल्स याचाही उल्लेख केला होता. संबंधित - Sushant singh Rajput आत्महत्या प्रकरण, पोलीस नोंदवणार अभिनेत्री संजनाचा जबाब दरम्यान, आता या प्रकरणात अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब मुंबई पोलीस नोंदविणार आहेत. सोमवारी तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या आधी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून सुशांत बद्दल बऱ्याच गोष्टी पोलिसांना कळाल्या आहेत. संजना ही सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेल्या दिल बेचारा मध्ये त्याच्या सोबत होती. आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर 24 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. संपादन - अजय कौटिकवार
  First published: